Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत पाचगणी पालिका प्रथम: स्वच्छता पुरस्कारात पांचगणी नगरपरिषदेची मांदियाळी

पाचगणी / वार्ताहर : पाचगणी नगरपरिषदेने नुकताच देश पातळीवरील पश्‍चिम विभागात स्वच्छता अभियानात पुरस्कार मिळवित हॅट्रिक साधली आहे. आता मुख्यमंत्र

पाटण तालुक्यातील जनतेचे जीवन उध्दवस्त होणार? पाटण तालुका नक्षलग्रस्त घोषित करा.
मुसळधार पावसाने काठी शाळेची संरक्षण भिंत जमीनदोस्त
विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे संसारोपयोगी साहित्य जळून खाक

पाचगणी / वार्ताहर : पाचगणी नगरपरिषदेने नुकताच देश पातळीवरील पश्‍चिम विभागात स्वच्छता अभियानात पुरस्कार मिळवित हॅट्रिक साधली आहे. आता मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत पाचगणी गिरीस्थान पालिकेला पुणे विभागात क वर्ग पालिका गटात प्रथम क्रमांक मिळाल्याचे पुणे विभागाचे आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले. लवकरच पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. देश व राज्य पातळीवर पुरस्कारांच्या मांदियाळीत पाचगणी नगरपरिषदेने आपले कोरले आहे. यास्तव मुख्याधिकारी निखिल जाधव तसेच अधिकारी कर्मचारी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शहर सक्षम बनविण्याकरता दिलेले योगदान आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल सन्मानित करण्यात आल्याचे सौरभ राव यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारचा स्वच्छ भारत नागरी अभियाना अंतर्गत पाचगणी गिरीस्थान पालिकेस पश्‍चिम विभागातील प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांचे पाचगणीसह सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विशेष म्हणजे अलीकडील दोन वर्षात पालिकेने प्राप्त केलेले पुरस्कार प्रशासकीय काळात संपादन केल्याने त्यांचे महत्व अधिक वाढले आहे. या पाठीमागे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव व नगरपरिषद अधिकारी व कर्मचार्‍यांची विशेष मेहनत कामी आली आहे.

COMMENTS