Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मालाड रेल्वे स्थानकात प्राध्यापकाची हत्या

किरकोळ वादातून धारदार हत्याराने केला हल्ला मुंबई ः मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लिव्ह इनमध्ये राहणार्‍या प्रेयसीची हत्या
आईनेच केली २० दिवसांच्या चिमुकलीची हत्या
पुण्यात दगड डोक्यात घालून एकाचा खून

किरकोळ वादातून धारदार हत्याराने केला हल्ला

मुंबई ः मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मालाड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकावर किरकोळ धक्क्याच्या वादातून एका तरुण प्राध्यापकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

विलेपार्ले येथील एन.एम. महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक आलोक सिंह (वय 31) हे शनिवारी रात्री लोकल ट्रेनने मालाड येथे आले होते. गाडी थांबल्यानंतर उतरत असताना दरवाजाजवळ उभ्या असलेल्या ओंकार शिंदे (वय 27) याला त्यांचा अनवधानाने धक्का लागला. या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. क्षणार्धात हा वाद हिंसक वळणावर गेला आणि संतापाच्या भरात ओंकारने आपल्या जवळील धारदार साधनाने आलोक सिंह यांच्यावर वार केला. गंभीर जखमी अवस्थेत सिंह फलाटावर कोसळले आणि रक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

COMMENTS