Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा जोतीराव फुले विचार जागर स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा

नाशिक प्रतिनिधी - ईलाईट सर्टिफिकेशन्स आणि ईनोव्हेटीव सोलुशन संस्थेच्या वतीने आयोजित महात्मा जोतीराव फुले विचार जागर स्पर्धा परीक्षेचा पारितो

दारूच्या दुकानावर चोरांचा डल्ला, दीड लाख रुपये लंपास | LOKNews24
आश्‍वासने आणि पक्षाचा अजेंडा
मुंबईतील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

नाशिक प्रतिनिधी – ईलाईट सर्टिफिकेशन्स आणि ईनोव्हेटीव सोलुशन संस्थेच्या वतीने आयोजित महात्मा जोतीराव फुले विचार जागर स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली.

याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधत आजची पिढी सोशल मिडीयाचा अधिक वापर करत असल्याने त्यांच्यापर्यंत पुस्तके पोहचविण्याची आवश्यकता व्यक्त केली.  तसेच समाज सुधारकांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी विचार जागर स्पर्धा उपक्रम अतिशय महत्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांनी मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिमा व ग्रामगीता भेट दिली.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ, मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, आशीर्वाद फाउंडेशनच्या डॉ. मनीषा जगताप, संस्थेचे आबासाहेब थोरात, स्वप्ना थोरात यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

COMMENTS