Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदोली धरणातून 7680 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग: वारणा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

शिराळा / प्रतिनिधी : चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून धरण 84.90 टक्के भरले आहे. परिणामी आज गुरुवार दुपारी दोनच्या सुमारास धरणाचे चार व

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक
पंढरपूर-घुमान यात्रेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते शुभारंभ
कराड तालुक्यातील वराडे येथील अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्रासाठी साडेसात कोटी

शिराळा / प्रतिनिधी : चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून धरण 84.90 टक्के भरले आहे. परिणामी आज गुरुवार दुपारी दोनच्या सुमारास धरणाचे चार वक्राकार दरवाजे उघडण्यात आले असून यातून 5150 क्युसेक्स तर वीजनिर्मिती केंद्रातून 1630 कयुसेक्स असा एकूण 7680 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीची पाणी पातळी वाढली आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. सलग पाच दिवस अतिवृष्टी झाली आहे. आठवडाभरात जवळजवळ 12 टीएमसी पाण्याची धरणांमध्ये आवक झाली आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढून धरणाने सांडवा पातळी ओलांडली.
पावसाचा जोर कायम असल्यामुळे आज गुरुवारी धरणाचे चारही दरवाजे 1 मीटरने उघडून 5150 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास टप्प्या-टप्प्याने हा विसर्ग अजूनही वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
सांगली जिल्हातील चांदोली हे आशिया खंडतील दोन नंबरचे मातीचे धरण आहे. 34.40 टीएमसी या धरणाची पाणी साठवण क्षमता आहे. दरवर्षी हे धरण शंभर टक्के भरते. येथील पावसाचे प्रमाण हे तीन हजार ते साडेचार हजार मिलिमीटरच्या दरम्यान आहे. याच धरणाच्या पाण्यावर महापारेषणचा 16 मेगावॅट विद्युत क्षमतेचा तर चार मेगावॅट वीज निर्मिती महती कंपनीच्या जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे. त्यामुळे चांदोलीतून 20 मेगावाट वीज निर्मिती होते. पावसाने उशिरा सुरुवात केली. मात्र, दमदार हजेरी लावली त्यामुळे आठवडाभरातच धरणांमध्ये 84.90 टक्के पाणीसाठा झाला. सध्या पावसाचा जोर कायम असून लवकरच धरण शंभर टक्केभरण्याची आशा आहे.
सध्या धरणाची पाणी पातळी 621.65 मीटर असून धरणात 29.21 टीएमसी पाणी साठा आहे. गेल्या बत्तीस तासात 85 मिलीमीटर पावसासह आजअखेर 1085 मिलीमीटर पाऊस येथे पडला आहे. धरणात 14443 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे.

COMMENTS