Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान मोदींनी लुटला फुटबॉलचा आनंदसिक्कीममध्ये खेळतांना युवकांसोबत साधला संवाद

गंगटोक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर असून, मंगळवारी त्यांनी युवकांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. एकीकडे विकास

देशात भ्रष्टाचार आणि जातीयवादाला थारा नाही
चांद्रयाननिमित्त राष्ट्रीय अंतराळ दिनाची घोषणा  
देशांतर्गत इंधनदर स्थिर राहण्याची शक्यता


गंगटोक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर असून, मंगळवारी त्यांनी युवकांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. एकीकडे विकास कामांचे उद्घाटन तर दुसरीकडे खेळ खेळत आनंद लुटला. दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी पंतप्रधानांनी गंगटोकमध्ये स्थानिक युवकांसोबत फुटबॉल खेळत अनौपचारिक संवाद साधला. या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सोशल मीडियावर त्यांनी या क्षणांची छायाचित्रे शेअर करत गंगटोकमधील सकाळ आणि युवकांसोबतचा खेळ ‘आनंददायी अनुभव’ असल्याचे नमूद केले. छायाचित्रांमध्ये पंतप्रधान निळ्या रंगाच्या स्पोर्ट्स जॅकेटमध्ये दिसत असून सहभागी युवक एकसारख्या क्रीडा पोशाखात मैदानावर खेळताना दिसतात. या दौर्‍यात पंतप्रधान सिक्कीम राज्य स्थापनेच्या 50 वर्षपूर्तीनिमित्त आयोजित समारोप सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तसेच गंगटोकमधील सुवर्णजयंती मैत्री मंजरि पार्क येथील ऑर्किडेरियमला भेट देण्याचेही नियोजन आहे. येथे विकसित करण्यात आलेले ऑर्किड अनुभव केंद्र पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. याशिवाय, शहरातील पालजोर स्टेडियममध्ये जाहीर सभेला संबोधित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दौर्‍याच्या पहिल्या दिवशी त्यांनी गंगटोकमध्ये रोड शोही केला होता. प्रतिकूल हवामानामुळे हा दौरा यापूर्वी पुढे ढकलावा लागला होता. या भेटीदरम्यान पंतप्रधान सुमारे 4 हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करणार आहेत. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी, पर्यटन, पर्यावरण आणि कृषी या क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये नामची येथील 100 खाटांचे रुग्णालय, देवराली येथील 30 खाटांचे रुग्णालय, तीस्ता नदीवरील दोन दुहेरी-लेन स्टील पूल आणि गंगटोकमधील नागरी सेवा अधिकारी संस्था यांचा समावेश आहे. या दौर्‍यातील फुटबॉल सत्रामुळे औपचारिक कार्यक्रमांपलीकडे जाऊन युवकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न दिसून आला. विकास प्रकल्पांसह सामाजिक सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.

COMMENTS