Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपरी निर्मळ येथील गुन्ह्यातील 57 आरोपींना अटकपूर्व जामीन

अ‍ॅट्रोसिटी आणि दंगलीसह होते अनेक कलमान्वये गुन्हा दाखल

राहाता प्रतिनिधी ः राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील अ‍ॅट्रॉसिटी व दंगलीच्या गुन्ह्यातील  57 आरोपींना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपीठ

कोपरगावच्या जनतेला न्याय मिळाला – नगराध्यक्ष वहाडणे
पवार व गडकरी म्हणजे देशाचे चमकते तारे : राज्यपाल कोश्यारींनी केला गौरव
शासकीय, खासगी कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थ वापरावर बंदी

राहाता प्रतिनिधी ः राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील अ‍ॅट्रॉसिटी व दंगलीच्या गुन्ह्यातील  57 आरोपींना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपीठाने 11 मार्च 2024 रोजी अंतिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पिंपरी निर्मळ येथे 6 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या दंगलीबाबत लोणी पोलीस ठाण्यात 73 लोंकावर अ‍ॅट्रॉसिटी व दंगलीचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये पत्रकार डॉ. विविध संस्थांचे पदाधिकारी दलित बांधव यांचा समावेश होता. सदर गुन्ह्यात 14 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना कोपरगाव जिल्हा न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आले होते. या प्रकरणातील सर्वच अटक आरोपींच्या वतीने अ‍ॅड. जयंत जोशी यांनी काम पाहिले होते.

तसेच 57 जणांचे अंतरीम अटकपूर्व जामीन 3 जानेवारी व 12 जानेवारी 2024 ला छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपिठात झाले होते.अंतिम जामीनासाठी गेल्या दोन महिन्यांपासुन उच्च न्यायालयात सुनावनी सुरू होती. त्यावर 11 मार्च 2024 रोजी न्यायालयाने निर्णय देत जामीन कायम केले आहेत. या प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे प्रथमदर्शनी केस नाही, तसेच आरोपींचा गुन्ह्याचे कामी स्पष्ट सहभाग निष्पन्न होत नाही. आरोपींवरचे आरोप राजकीय वादातून असून त्यास वेगळा रंग दिला गेल्याचा युक्तीवाद करुन आरोपीस जामीन मंजुर करावा, असा युक्तीवाद अ‍ॅड शैलेश चपळगावकर यांनी केला. युक्तीवाद ऐकून घेवून न्यायालयाने जयश्री घोरपडे, जयश्री कदम, सुनील घोरपडे, कैलास घोरपडे, सागर मोरे, अर्जुन निर्मख, राजेंद्र निर्मख, शिवनाथ घोरपडे, दिलीप पारखे, नंदु पारखे, अशोक निर्मळ,  सह 57 आरोपींचा अटकपूर्व अंतिम जामीन तपासात सहकार्य करणे पुराव्यांशी छेडछाड न करणे या अटीवर मंजूर केला आहे. याकामी अरोपींच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ, अ‍ॅड. शैलेश चपळगावकर, अ‍ॅड. अविनाश बारहाते पाटील, अँड व्ही डी होण, अ‍ॅड. शुभम कोते यांनी काम पाहिले.

घटनेच्या वेळी ओपीडीमध्ये तरीही अरोपी. मी घटनेच्या वेळी हॉस्पीटलच्या ओपीडीमध्ये रूग्न तपासत होतो.त्यावेळेसचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहेत.केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने ही नावे टाकण्यात आली.यामुळे प्रंचड त्रास झाला मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे मुळे दिलासा मिळाला आहे.
डॉ. शिवनाथ घोरपडे.

COMMENTS