Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रांजल नाईकनवरेची ‘नवोदय’साठी निवड

अकोले : नवोदय विद्यालय समितीमार्फत १३ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत जि.प. प्राथमिक शाळा, औरंगपूर (ता. अकोले) येथील विद्यार्थीनी प्रांजल अभिमान नाईकनवरे हिने ९७.५० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची जवाहर नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्वर येथे निवड झाली आहे. प्रांजल ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, राजूर येथील वरिष्ठ लिपिक अभिमान नाईकनवरे यांची कन्या आहे. तिला जाधव व गायकर यांनी मार्गदर्शन केले.  तिच्या या यशाबद्दल प्रकल्प अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

कोपरगावात ‘पॅलिएटिव्ह केअर अँड पेन युनिट’ची सुरुवात
इस्लामपेठ प्रीमियर लीग स्पर्धेत ‘स्टार ॲटो’ विजेता
माका येथे ५५ लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

अकोले : नवोदय विद्यालय समितीमार्फत १३ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत जि.प. प्राथमिक शाळा, औरंगपूर (ता. अकोले) येथील विद्यार्थीनी प्रांजल अभिमान नाईकनवरे हिने ९७.५० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची जवाहर नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्वर येथे निवड झाली आहे. प्रांजल ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, राजूर येथील वरिष्ठ लिपिक अभिमान नाईकनवरे यांची कन्या आहे. तिला जाधव व गायकर यांनी मार्गदर्शन केले.

 तिच्या या यशाबद्दल प्रकल्प अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

COMMENTS