Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रकाश आंबेडकर आज लोकसभेबाबत भूमिका जाहीर करणार ?

अकोला : प्रकाश आंबेडकर आज अकोल्याहून लोकसभा निवडणुकीसाठी  भूमिका जाहीर करु शकतात. सोबतच महाविकास आघाडीपासून काडीमोड घेण्याची घोषणा देखील करण्याची

‘वंचित’चा ‘मविआ’सोबत अधिकृत काडीमोड
लाचारी चळवळीला संपवण्याचा प्रयत्न- प्रकाश आंबेडकर  
अध्यादेश कायदेशीर प्रक्रियेत अडकणार

अकोला : प्रकाश आंबेडकर आज अकोल्याहून लोकसभा निवडणुकीसाठी  भूमिका जाहीर करु शकतात. सोबतच महाविकास आघाडीपासून काडीमोड घेण्याची घोषणा देखील करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भूमिका जाहीर करताना प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबद्दल नेमकं काय बोलणार? याची उत्सुकता आहे. दुसरीकडे प्रकाश शेंडगेंचा ओबीसी मोर्चा, जरांगे यांना मानणारा गट आणि इतर काही छोटे पक्ष आणि संघटना आंबेडकरांसोबत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबेडकर तिसरी आघाडी स्थापणार असल्याची चर्चा रंगली आहे. तिसऱ्या आघाडीत वंचित 29 जागा लढण्याची चिन्ह आहेत. 

प्रकाश आंबेडकरांनी माविआला दिलेलं अल्टीमेटम आज संपणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी संदर्भात काय निर्णय घेणार? हे आज स्पष्ट होईल. तर दुसरीकडे राज्यात पुन्हा वंचित बहुजन आघाडी आणि डावे पक्ष एकत्र येणार का? असा प्रश्न आहे. कारण महाविकास आघाडीत सीपीएम दिंडोरी लोकसभा जागेसाठी आग्रही होते पण ती जागा न मिळाल्याने सीपीएममध्ये नाराजी आहे. सीपीएम पक्षाचे नेते आणि माजी आमदार जे पी गावित, नेते डी एल कराड यांनी वंचितच्या नेत्यांची भेट घेऊन युतीबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पक्षाशी देखील वंचितची चर्चा सुरु आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर राज्यात तिसऱ्या आघाडीचं नेतृत्त्व करणार का असा सवाल विचारला जातोय.  गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीविषयी चर्चा होती. ते नेमकं कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आज मात्र त्यांनी या चर्चेवर पडदा पाडला असून मी येत्या 27 मार्च रोजी अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहे, असं त्यांनी सांगितलंय. तसेच, मी माझ्या वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून अर्ज भरणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

COMMENTS