‘यशस्वीतेचा सुवर्णमंत्र’ या पुस्तकातून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी :- अभिनेते राहुल सोलापूरकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘यशस्वीतेचा सुवर्णमंत्र’ या पुस्तकातून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी :- अभिनेते राहुल सोलापूरकर

अहमदनगर प्रतिनिधी :- अंगी कुठलाही अहंकार न ठेवता काम कसे करावे आणि यशस्वी कसे व्हावे याचा मूलमंत्र लाईफ लाईन उद्योग समूहाचे अध्यक्ष एन. बी. धुमाळ यां

जळीतकांड दुर्घटनेचा तपास आयपीएस अधिकारी व सीआयडीकडे सोपवण्याची मागणी
नगर-मनमाड महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू
शिर्डीमध्ये स्वतंत्र कोविड रुग्णालय ; मुश्रीफ यांची घोषणा, साई संस्थानची घेणार मदत


अहमदनगर प्रतिनिधी :- अंगी कुठलाही अहंकार न ठेवता काम कसे करावे आणि यशस्वी कसे व्हावे याचा मूलमंत्र लाईफ लाईन उद्योग समूहाचे अध्यक्ष एन. बी. धुमाळ यांनी आपल्या ‘यशस्वीतेचा सुवर्णमंत्र’ या ग्रंथाच्या माध्यमातून नव्या पिढीला दिला आहे. त्यातून तरुणांनी प्रेरणा घावी व यशस्वी व्हावे असे आवाहन सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.
येथील माऊली संकुल सभागृहात आयोजित ‘यशस्वीतेचा सुवर्णमंत्र’ या ग्रंथाचे प्रकाशन व एन. बी. धुमाळ चॅरीटेबल ट्रस्टच्या उद्घाटन व लोकार्पण प्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. बी. व्ही. जी. ग्रुप चे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास लाईफ लाईन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष एन. बी. धुमाळ, सौ. सुनंदा धुमाळ, राजहंस प्रकाशन चे संचालक संपादक डॉ. सदानंद बोरसे, आ. संग्राम भैय्या जगताप, प्रा. शशिकांत गाडे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 
यावेळी बोलतांना राहुल सोलापूरकर पुढे म्हणाले की, या पुस्तकाचे स्वतंत्र २ पुस्तके झाली असती. पहिल्या भागात मी यशस्वी कसा झालो याची कहाणी आहे. तर दुसऱ्या भागात यशाचा सुवर्ण मंत्र त्यांनी वाचकांना दिला आहे. संस्कार हे केवळ शिकवून होत नाहीत, तर ते अंगिकारावे ही लागतात. सुदैवाने एन.बी.धुमाळ यांच्यावर आजी, आजोबा आणि आई, वडील यांच्याकडून उत्तम संस्कार झाले. आणि संस्कारामुळेच ते घडले. आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टीवरून आपले इगो दुखावतात आणि इगो दुखावले की माणसे आपल्यापासून दूर जातात. असे सांगून डेबूजी झिंगराजी गायकवाडांचे संत गाडगे बाबा कसे झाले. बाबा आमटे कसे घडले हे ही त्यांनी सांगितले. त्याच बरोबर  यशस्वी तेचा सुवर्ण मंत्र हे पुस्तक एन. बी. धुमाळ यांच्याच आवाजात ऑडीओ बुक च्या माध्यमातून राजहंस प्रकाशनाने पुढे आणावे असे ते म्हणाले. बी. व्ही. जी. ग्रुप ऑफ कंपनीज चे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड म्हणाले, की ‘यशस्वीतेचा सुवर्णमंत्र’ हे पुस्तक दिप स्तंभासारखे समाजाला दिशा देण्याचे काम करेल. भविष्यकाळात अनेक भाषांमध्ये रूपांतरित होऊन भारताबाहेरही जाईल. कुठलाही उद्योग व्यवसाय करताना माणुसकीची भावना जपली पाहिजे. ती फार महत्त्वाची आहे. असा सल्ला धुमाळ यांनी या पुस्तकातून दिला आहे. 
डॉ. सदानंद बोरसे म्हणाले, ‘यशस्वीतेचा सुवर्णमंत्र’ या पुस्तकाच्या रूपाने राजहंस प्रकाशन च्या दालनात दाखल केल्या बद्दल धुमाळ यांचे आम्ही आभारी आहोत. सर्वच पुस्तके केवळ अर्थ कारणासाठी नसतात तर त्यातील काही पुस्तके समाजाला दिशा देण्याचेही काम करतात. तेच काम हे पुस्तक करणार आहे.  पुस्तकाचे लेखक एन. बी. धुमाळ म्हणाले की, माझ्या आयुष्यात मी दिडशे हून अधून यशस्वी व्यक्तींचे आत्मचरित्र वाचले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्यात तुमचा आत्मा ओतावा लागतो. धीरूभाई अंबानी, डॉ. नितु मांडके, हनुमंतराव गायकवाड अशी अनेक माणसे माझे आदर्श आहेत. पुस्तकांनीच माझ्या जीवनात आमूलाग्र बदल घडला. तुम्ही तुमचे क्षेत्र ठरवा आणि त्यात उंच भरारी घ्या असे सांगून एन. बी. धुमाळ ट्रस्ट च्या माध्यमातून आगामी काळात हुशार, गरीब व होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी १ कोटी रुपये दान करण्याचा संकल्प त्यानी यावेळी व्यक्त केला.  या पुस्तकाला आकार देणाऱ्या व कार्यक्रमास विशेष सहकार्य करणाऱ्या शिल्प चित्रकार प्रमोद कांबळे, सचिन कलमदाने, प्र. के. कुलकर्णी, ज्ञानेश शिंदे, दिपक रोकडे, मयूर पटवा व नवनाथ चोभे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.  तुकाराम शेळके यांनी प्रास्ताविक केले. वीणा दिघे यांनी सूत्रसंचालन केले. महेश धुमाळ यांनी आभार मानले.  यशस्वीतेसाठी डॉ. संदिप धुमाळ, महेश धुमाळ, सुदाम वाळके, संजय गाडे, तुकाराम शेळके, भगवान राऊत, मकरंद घोडके आदींनी विशेष परिश्रम घेतले. 

COMMENTS