Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहित शर्माने लुटला होळीचा आनंद

मुंबई प्रतिनिधी - देशभरात होळी व धुलिवंदनाचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. अनेक लोकांनी एकत्र येत रंगांची उधळण केली. देशभरातून हो

रोहित शर्माला भासतेय बुमराहची कमी ? 
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मावर वाहतूक पोलिसांची कारवाई
आशिया चषकापूर्वी रोहितचं तिरूपती बालाजीला साकडं

मुंबई प्रतिनिधी – देशभरात होळी व धुलिवंदनाचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. अनेक लोकांनी एकत्र येत रंगांची उधळण केली. देशभरातून होळीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मानेही होळी खेळण्यात कोणतीही कसर सोडली नाही. रोहितने त्याचा होळी खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ३७ वर्षांचा रोहित एखाद्या लहान मुलाप्रमाणे होळी खेळला. रोहितने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. रोहित शर्माने पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबत होळीचा आनंद घेतला. रोहितसोबत यावेळी त्याचे मुंबई इंडियन्सचे सहकारी देखील बघायला मिळाले. रोहित जमिनीवर पडलेल्या पाण्यावर घसरला तर काही गाण्यांवर देखील थरकतांना दिसला. रोहितने यावेळी त्याची व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्या कॅमेऱ्यावर देखिल पाणी मारले. मुंबई इंडियन्सने त्याचा व्हिडिओ स्वतंत्रपणे त्यांच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट केला आहे.

COMMENTS