Homeताज्या बातम्यामनोरंजन

भक्तिरंगात रंगली जान्हवी कपूर

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत असते. ज्येष्ठ दिवंगत

मनपा पतसंस्था व झेडपी सोसायटी निवडणुकीत जोरदार शक्तीप्रदर्शन
अटक न करण्यासाठी लाच घेणाराच झाला अटक
दहावीचा निकाल आज होणार जाहीर  

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत असते. ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची लेक असणाऱ्या जान्हवीने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे .बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टारकिड असलेल्या जान्हवीने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. जान्हवीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, मिली, रूही यांसारख्या चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे. जान्हवीचा दोस्ताना-2, तख्त हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तत्पूर्वी जान्हवीने नुकतंच भारतातल्या प्रसिद्ध मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे. जान्हवी कपूरचा देवावर आणि पूजेवर खूप विश्वास आहे. ती नेहमीच मंदिरात जाऊन देवाचे आशीर्वाद घेताना दिसते. आता जान्हवी आंध्र प्रदेशातील तिरुमाला मंदिरात पोहोचली आहे. तिरुमाला मंदिरात जान्हवीने तिरुपती बालाजीसमोर डोकं ठेऊन आशीर्वाद घेतले आहेत. यावेळी जान्हवीसोबत तिची बहिण ख़ुशी कपूर देखील होती. जान्हवीचा दर्शनादरम्यानचा व्हिडीओ आता समोर आला आहे. मंदिरात दर्शनादरम्यान जान्हवी फक्त दक्षिण भारतीय अवतारात दिसली. व्हीआयपी दर्शनादरम्यान ती मंदिरासमोर जमिनीवर डोके टेकवून बसलेली दिसली. जान्हवीच्या मंदिरात दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जान्हवी मंदिरात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ती तिची दिवंगत आई श्रीदेवी यांच्या वाढदिवसानिमित्त तेथे पोहोचली होती. जान्हवी कपूरही सारा अली खानसोबत केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी गेली होती. जिथे बर्फाळ मैदानात दोघीनी खूप मजा केली आणि पूजा केली. यादरम्यान सारा आणि जान्हवीही भोलेनाथच्या रंगात रंगलेल्या दिसल्या. जान्हवीचा हा भक्ती अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडतो.

COMMENTS