Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयपीएलवर बेटिंग लावणारे तीन आरोपी अटकेत

पुणे/प्रतिनिधी ः सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाइन बेटिंग घेणार्‍या तीन सट्टेबाजांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथका

इस्लामपुरात रंगणार 40 वर्षांवरील टेनिस बॉल क्रिकेट लिग
आयपीएलवर सट्टा लावणार्या सट्टेबाजांवर सेलूत छापा; चार आरोपींविरुध्द गुन्हा दाखल
वनडे क्रमवारीत विराट कोहलीची सहाव्या स्थानी झेप

पुणे/प्रतिनिधी ः सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाइन बेटिंग घेणार्‍या तीन सट्टेबाजांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने तळेगाव दाभाडे मधील एका सोसायटीतून अटक केली आहे. रोमी सुरेश नेहलानी (वय – 36), विनोद राजु सतिजा (32) आणि लखन राजु गुरूबानी अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.
या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी सात मोबाईल, एक लॅपटॉप, पाच वह्या तसेच इतर मुद्देमाल असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती दिली आहे. याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात पोलिस नाईक शैलेश गुलाब मगर यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. इंडियन प्रिमीयर लिग टी-20 च्या मुंबई इंडियन्स विरूध्द सन राईजर्स हैदराबाद या क्रिकेट मॅचवर मोबाईल कॉलव्दारे काहीजण पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील लेक पॅराडाईज सोसायटीत एका बंगल्यात बेटिंग घेत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडी विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी माहितीची खातरजमा करत, संबंधित ठिकाणी लेक पॅराडाईज सोसायटीच्या बंगला क्रमांक 44 मध्ये छापा टाकला. यावेळी त्याठिकाणी संबंधित आरोपी रोमी सुरेश नेहलानी, विनोद राजु सतिजा आणि लखन राजु गुरूबानी हे तिघे बेटिंग घेत होते. त्यानुसार पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून बेटिंगचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस खाडे करीत आहेत.

COMMENTS