Homeताज्या बातम्या

शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी पत्रकार अनिल धमने

नांदेड : शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील धमने यांची नियु

तृणमूलच्या प्रतोदपदी कल्याण बॅनर्जी20 खासदारांच्या बंडांनंतर ममता बॅनर्जी यांचा निर्णय
पुण्यातील रेव्ह पार्टी कारवाईवर सुषमा अंधारेंचे प्रश्‍नचिन्ह154 जण उपस्थित असतांना गुन्हा केवळ 78 जणांवरच का?
तृणमूल काँग्रेसमध्ये फूट; 20 खासदार देणार एनडीएला पाठिंबा



नांदेड : शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील धमने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेनेचे मुख्य सचिव संजय मोरे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, प्रशांत पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे प्रदेशाध्यक्ष ड. डॉ. पी. बी. कुंभार यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
अनिल  धमने हे गेल्या दोन वर्षांपासून शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. शिवसेना ओबीसी, व्हीजे-एनटी विभागाचे नांदेड जिल्हाप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्य निवड समितीच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने काम करताना त्यांनी पक्षाची विचारधारा आणि संघटन तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. धमने हे गेल्या 28 वर्षांपासून राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांचा व्यापक संपर्क आणि प्रभाव आहे. त्यांच्या कार्यकौशल्याची आणि संघटन क्षमतेची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर राज्यस्तरीय महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. प्रदेशाध्यक्ष ड. डॉ. पी. बी. कुंभार यांनी प्रदान केलेल्या नियुक्तीपत्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवसेना पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविताना समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन कार्य कराल, असा विश्वासही नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आला आहे. या नियुक्तीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष शंकर नांदेडकर नांदेड जिल्हाप्रमुख राजकुमार श्रीरामवार यांच्यासह राज्यभरातील अनेक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि मित्रपरिवाराने अनिल पाटील धमने यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS