राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे ही कोणत्याही सरकारची सर्वात मोठी जबाबदारी असते. शेतीवर अवलंबून असले
राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे ही कोणत्याही सरकारची सर्वात मोठी जबाबदारी असते. शेतीवर अवलंबून असलेल्या लाखो कुटुंबांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वेळोवेळी ठोस आणि परिणामकारक निर्णय घेणे आवश्यक असते. अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शेतकरी कर्जमाफीसंदर्भात केलेली घोषणा ही राज्यातील शेतकरी वर्गासाठी दिलासादायक आणि आश्वासक ठरणारी आहे.महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना पूर्वी ५० हजार रुपयांपर्यंत मिळणारा लाभ आता २ लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे, नैसर्गिक आपत्ती, हवामानातील अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडतात. अशा परिस्थितीत अधिक आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो.याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे प्रोत्साहनपर अनुदानासाठी २०२६-२७ चे पीक कर्ज भरण्याची अट रद्द करण्याची घोषणा. अनेक शेतकरी आर्थिक अडचणींमुळे अशा अटी पूर्ण करू शकत नाहीत आणि परिणामी त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. ही अट हटवून सरकारने शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार केल्याचे स्पष्ट दिसून येते. हा निर्णय प्रशासनातील संवेदनशीलता आणि लोकाभिमुख दृष्टिकोन अधोरेखित करणारा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “कर्जमाफीच्या निर्णयासाठी २०२९ पर्यंत थांबू शकलो असतो; मात्र आम्ही तसे केले नाही,” असे सांगत निर्णयक्षम नेतृत्वाचे दर्शन घडविले. लोकहिताचे निर्णय पुढे ढकलण्याऐवजी योग्य वेळी धाडसाने निर्णय घेण्याची वृत्ती ही प्रभावी नेतृत्वाची ओळख मानली जाते. जनतेच्या अपेक्षा आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत तातडीने उपाययोजना करण्याची तयारी हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे. राज्याच्या विकासाचा पाया मजबूत करायचा असेल तर शेती आणि शेतकरी सक्षम असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, त्यांना आर्थिक आधार देणे आणि संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे कोणत्याही प्रगतिशील सरकारचे कर्तव्य आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले निर्णय केवळ आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांप्रती सरकारची बांधिलकी व्यक्त करणारे आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने विकासाबरोबरच शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिल्याचा संदेश या निर्णयातून मिळतो. शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून राज्याच्या प्रगतीचा प्रमुख आधारस्तंभ आहे, याची जाणीव ठेवून घेतलेले हे निर्णय भविष्यात शेती क्षेत्राला अधिक बळ देणारे ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील शेतकरी केवळ आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा करतो. त्या दृष्टीने पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणा आश्वासनांपासून कृतीकडे वाटचाल करणाऱ्या असल्याचे समर्थकांचे मत आहे. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा संदेश या निर्णयांतून स्पष्टपणे दिसून येतो. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम शेती, आत्मनिर्भर शेतकरी आणि लोकाभिमुख प्रशासन ही त्रिसूत्री आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या या उपाययोजना त्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाऊ शकते. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविण्याचा आणि त्यांच्या भविष्याला नवी आशा देण्याचा प्रयत्न म्हणून या निर्णयांची नोंद महाराष्ट्राच्या राजकीय आणि कृषी इतिहासात निश्चितच महत्त्वाची ठरेल. ४-५ हजार कोटींचा बोजा येईल. पण शिस्तीचा भाग म्हणून ही अट आणली आहे, समजा एक लाखांपर्यंत नेली तर २ लाख शेतकरी फायदा न मिळणारे राहतात. सगळ्याचं मत होतं, २ लाख शेतकरी का सोडायचे हा खरा मुद्दा त्यांच्या समोर होता.


COMMENTS