यशस्वी बंडात फडणवीसांची चतुरस्त्रता !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यशस्वी बंडात फडणवीसांची चतुरस्त्रता !

राजकारण हे अनिश्चिततेचे भांडार असते. तरीही कोणत्या क्षणाला काय घडेल याचे पूर्वानुमान राजकारणातही बांधले जातात. सध्या महाराष्ट्राचे राजकारण हे अनिश्चि

कराड तालुक्यात साडेसत्तावीस लाखांची वीज चोरी
पत्रकार संजय वाघ यांच्या वरील गुन्ह्याचा तपास सी. आय .डी. कडे द्यावा
जिल्ह्यात शिंदे गटाचे 17 जागांवर उमेदवार विजयी

राजकारण हे अनिश्चिततेचे भांडार असते. तरीही कोणत्या क्षणाला काय घडेल याचे पूर्वानुमान राजकारणातही बांधले जातात. सध्या महाराष्ट्राचे राजकारण हे अनिश्चिततेकडून धक्क्यावर धक्का देत धक्का तंत्राने वाटचाला करीत स्थिरतेकडे आले आहे. दहा दिवसांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात खासकरून शिवसेनेत जी बंडखोरी झाली त्याचे दृश्य परिणाम महाविकास आघाडी सरकार जाऊन नवे सरकार स्थापण्यात झाला. परंतु, नवीन सरकारचे गठन करताना महाराष्ट्राला दोन धक्के मिळाले. त्यातील पहिला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होऊन फडणवीस यांनी सत्तेबाहेर असणं हा एक आणि दुसरा म्हणजे काही वेळातच फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं. फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होत असल्याची घोषणा केली असली तरी, महाविकास आघाडी गेल्यानंतर हा महाराष्ट्राला आणखी एक मोठा धक्का होता. खरेतर शिवसेना आणि महाविकास आघाडी अशा दोघांच्या विरोधात एकाचवेळी बंड करणारे नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदे हे दिसत असले तरी त्यामागे खरी चतुरता फडणवीस यांच्या नेतृत्वाची होती. राजकारणात नुसते बंड करून काहीच साध्य होत नाही. बंडानंतरचा आराखडा असायला हवा. हा आराखडा जितका मजबूत तितकं बंड यशस्वी होण्याची शक्यता बळावते. खरेतर बंड हे यशस्वी होण्याच्या शक्यता फारच कमी असतात. त्यामुळे, तह स्विकारावे लागतात. एकनाथ शिंदे हे मास लिडर नाहीत. तरीही, त्यांच्या बंडाला पन्नास आमदारांची साथ मिळते, याचे मुख्य कारण बंडाआधीच ते यशस्वी करण्याचा आराखडा तयार असावा, या शंकेला बळ मिळते. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व हे जसे मास लिडर चे नाही तसे ते बौध्दिक नेतृत्वही नाही. तरीही, पन्नास आमदार सत्तेतील आघाडीला सोडून जातात. त्यांच्यात केवळ आमदारांचाच नव्हे तर मंत्र्यांचाही समावेश असतो, ही बाब फार दखल घेण्याजोगी आहे. एवढ्या लोकांना भौगोलिक, आर्थिक आणि बौद्धिक नेतृत्व देऊन सांभाळणे, ही खरी कसोटी होती. या कसोटीत देवेंद्र फडणवीस हे होते आणि त्यात ते शंभर टक्के यशस्वी झाले. पूर्ण बहुमताच्या सरकारला त्यांनी अवघ्या दहा दिवसांच्या आत बहुमताला सामोरे न जाताच पाय‌उतार केले, ही बाब अनन्यसाधारण आहे. त्यामुळे, या सर्वांची फलनिष्पत्ती म्हणून देवेंद्र फडणवीस हे ‘पुन्हा आले ‘ असं राज्यातील लोकांना वाटले होते. सामान्य माणसापासून तर काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत सर्वांना हेच वाटतं होतं की, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील. प्रत्यक्षात मात्र, शपथविधीला अवघा दोन तासांचा अवधी उरला असताना देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रत्यक्षात मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचे उच्चारण होताच सगळ्यांच्या भुवया वर गेल्या. त्यानंतर महाराष्ट्रातील चर्चाविरांनी अनेक प्रकारच्या उलटसुलट चर्चांना उधाण आणले. त्यास फडणवीस यांनी एका वाक्यात पूर्णविराम दिला की, ‘ मी पक्षाचा कार्यकर्ता असून पक्षादेश सर्वोच्च मानतो.’ सत्ता ही अशा सर्वप्रकारच्या कसोटीतून यशस्वी होतच राबवावी लागते. फडणवीस यांच्याकडे ते गुण परिपूर्ण आहेत. महाविकास आघाडी विरोधात झालेले बंड हे संचित परिणामांची फलनिष्पत्ती असली तरी सावज पकडण्यासाठी अचूकता आणि पूर्व‌अंदाज ठासून असावा लागतो. त्यात आत्मविश्वास हा तेवढाच असावा लागतो. महाराष्ट्रात झालेल्या या सत्ताबदलांना आणखी काही कसोट्यातून जावे लागणार आहे. बंड यशस्वी करणारे तहात पराभूत होत नसतात! नव्या सरकारला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेचे कल्याण करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

COMMENTS