Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काल्याच्या कीर्तनाने वीरभद्र महाराज यात्रेची सांगता

शिर्डी/प्रतिनिधी ः शहराचे ग्रामदैवत वीरभद्र व मायंबा यांचे यात्रा दि. 6 एप्रिल ते एप्रिल 11 या दरम्यान आयोजित करण्यात आली होती.यात्रेमध्ये जंगी क

विखे व श्री गणेश कारखान्याच्या कामगारांना तीन हप्त्यात थकीत देयके द्या : उच्च न्यायालय
शेतमजुराची मुलगी झाली वनरक्षक
राज्यात महाविकास आघाडी असताना काँग्रेस- राष्ट्रवादीत आरोपांच्या फैरी… विनयभंगाचा गुन्हा

शिर्डी/प्रतिनिधी ः शहराचे ग्रामदैवत वीरभद्र व मायंबा यांचे यात्रा दि. 6 एप्रिल ते एप्रिल 11 या दरम्यान आयोजित करण्यात आली होती.यात्रेमध्ये जंगी कुस्त्यांचा हंगामा, बैलगाडा शर्यत,श्रीराम कलापथक मंडळाचा कार्यक्रम तर श्री परमपूज्य श्री.श्री. 1008 महामंडळेश्‍वर स्वामी शनि भक्त संत सुखदेव महाराज यांचे जाहीर हरी कीर्तनाने यात्रेची सांगता याप्रसंगी बोलताना संत सुखदेव महाराज म्हणाले की जीवन हा एक मायेचा बाजार असून यात मुले, बायको, सोयरे, हे कोणीही तुमचे नाहीत. आजच्या काळातील शहरातील माणसे ही आपले चेहरे हरवलेले आहेत. एक वेळ प्राण्यांना देव समजतो परंतु माणसांना देव समजत नाही हे त्यांनी विविध उदाहरणे देऊन सांगितले.
सध्याच्या मानवी जीवनात फक्त दुपारची सावली असून ही सावली कधी निघून जाईल हे समजणार नाही. त्यासाठी रामनाम गरजेचे आहे आपण सर्व संसारी माणसे मायेमध्ये गुंतलो असून परमेश्‍वराला विसरलो. यासाठी हरिनामा मध्ये रामनमन व्हावे भगवंताचे नामस्मरण करावे.मानवी शरीर रुपी जीवन रथ असून त्याचे संसार व परमार्थ हि चके आहेत. यातील एखादे चाक हे एक चाक लहान व एक मोठे झाल्यावर रथ पुढे जात नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आपले आई-वडील हेच आपले खरे दैवत असून आई-वडिलांना प्रेम द्यावे,आई-वडिलांची सेवा हीच परमेश्‍वराची सेवा म्हणून करावी. प्रेम तेथे समाधान आणि समाधान तेथे आनंद माणसाने श्रद्धा ठेवावी परंतु ती अंधश्रद्धा नसावी. प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहावे.कारण व्यसन सर्वच समाजाला घातक ठरते.असे सुखदेव महाराज यांनी आपल्या वाणीतून सांगत ग्रामस्थांना मंत्रबद्ध केले. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने व सर्व विश्‍वस्तांच्या हस्ते महाराजांचा स्मृतिचिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला ही कीर्तन रुपी सेवा सुनील सखाहरी सदाफळ, प्रवीण र. सदाफळ यांनी दिली, तर महाप्रसादाची सेवा सुनील शा.सदाफळ, प्रफुलशेठ पिपाडा, प्रितेश पिपाडा, पाणी पाऊचची सेवा दयानंद डोके यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच देणगीदारांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या कीर्तनाला शहरातील ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS