Homeताज्या बातम्यामनोरंजन

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान दुसऱ्यांदा लग्न करणार

माहिरा खान पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. भारतातही तिचे लाखो चाहते आहेत. 2017 मध्ये शाहरुख खानच्या रईस या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पद

भावाच्या मारहाणीत लहान भावाचा मृत्यू
महसूल तूट चिंताजनक
ठाकरेंनी चर्चा न करता राजीनामा दिला

माहिरा खान पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. भारतातही तिचे लाखो चाहते आहेत. 2017 मध्ये शाहरुख खानच्या रईस या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. एकेकाळी तिचे नाव रणबीर कपूरसोबतही जोडले गेले होते. सध्या माहिरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. माहिरा दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पुढच्या महिन्यात ती तिचा प्रियकर सलीम करीमसोबत लग्नगाठ बांधणार आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, माहिरा खान आणि सलीम करीम यांनी लग्नाच्या कार्यक्रमासाठी पाकिस्तानच्या पंजाबमधील एक हिल स्टेशन निवडले आहे. या सोहळ्याला त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित असतील. माहिरा तिचा प्रियकर सलीम करीमसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सप्टेंबर 2023 मध्ये दोघे लग्न करणार असल्याची माहिती आहे. मात्र, ‘हमसफर’मधील या अभिनेत्रीने मात्र या वृत्तांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. माहिरा खान अनेक वर्षांपासून सलीम करीमसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी आपले नाते जगाच्या लपवून ठेवले होते. मात्र, दोघांना अनेक कार्यक्रमांमध्ये आणि मित्रांसोबतच्या फोटोंमध्ये एकत्र पाहिले गेले. सलीम एक बिजनेसमॅन आहे.

COMMENTS