Homeताज्या बातम्या

बहिणीची छेड काढण्याच्या रागातून मित्रानेच कापला मित्राचा गळा 

धुळे प्रतिनिधी - धुळे शहरा जवळील मोहाडी गावाजवळील एका शेतात काल अज्ञात इसमाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. यात ज

एकल प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्या वापरण्याचे मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन
समता चॅलेंजरने पटकावला करंडक व प्रथम पारितोषिक
अक्षयच्या दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून द्या

धुळे प्रतिनिधी – धुळे शहरा जवळील मोहाडी गावाजवळील एका शेतात काल अज्ञात इसमाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. यात ज्या व्यक्तीचा खून करण्यात आला होता, त्याचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले होते. अगदी क्रूर पद्धतीने करण्यात आलेल्या खुनाचा मोहाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत छडा लावला असून यात 21 वर्षीय आरोपीला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली आहे.

धुळे शहराजवळी ल मोहाडी परिसरात एका अज्ञात इसमाचा खून झाल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली होती, याची माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते, या खुनाचा मोहाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत छडा लावला असून या घटनेतील मयत सतीश बापू मिस्तरी वय वर्ष 22 हा चेतन प्रताप गुजराती वय वर्ष 21 याच्या बहिणीची छेड काढत असल्याच्या कारणावरून चेतन गुजराती येणे सतीश मिस्तरी याचा निर्घृण खून केल्याची कबुली दिली आहे.

याप्रकरणी खुनातील मुख्य आरोपी चेतन प्रताप गुजराती या 21 वर्षीय आरोपीला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली असून याच खूनातील दुसरा संशयित आरोपी विधी संघर्ष बालक याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत, बहिणीची छेड काढण्याच्या रागातून मित्रानेच मित्राचा गळा चिरून खून केल्याची ही धक्कादायक घटना मोहाडी परिसरात घडली असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

या घटनेतील मयत सतीश मिस्त्री याला आरोपी चेतन गुजराती यांनी दुपारी एक वाजेच्या सुमारास पार्टी करण्यासाठी बोलावून घेतल्यानंतर एका शेतात त्याने आपल्या बहिणीची छेड काढण्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे कबुली दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून याबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे.

COMMENTS