Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औसा बाजार समितीचे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर

औसा प्रतिनिधी - कृषी उत्पन्न बाजार समिती औसाच्या संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी 28 एप्रिल रोजी मतदान होत असून या निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँ

बिरवली येथे सर्व रोग निदान शिबीरास प्रतिसाद
भोकर तालुक्यात भाजपाला खिंडार
राज्यभरात चोरी करणाऱ्या इंदोर येथील टोळीसह एका स्थानिक टोळीला अटक  

औसा प्रतिनिधी – कृषी उत्पन्न बाजार समिती औसाच्या संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी 28 एप्रिल रोजी मतदान होत असून या निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धव ठाकरे शिवसेना गट एकत्रित येवून महाविकास आघाडी निवडणूक लढविणार असल्याची माहिती पॅनल प्रमुख अ‍ॅड श्रीपतराव काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली व पँनलचे 16 उमेदवार घोषित केले .
सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून नारायण लक्ष्मण लोखंडे, राजेंद्र हरिश्चंद्र भोसले, किशोर अरिंवद जाधव, प्रकाश रघुनाथ भोंग, सचिन दगडू गिराम, अ‍ॅड. श्रीकांत शाहूराज सूर्यवंशी, दत्तोपंत दिगंबर सूर्यवंशी, सहकारी संस्था इतर मागास प्रवर्गातून अहमद तांबोळी, सहकारी संस्था भटक्या जमाती मतदार संघातून दिलीप विश्वनाथ लवटे सहकारी संस्था महिला मतदारसंघातून रूक्मीनबाई श्रीधर साळुंखे व शिवगंगा व्यंकट साळुंखे, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून सतीश रघुनाथ शिंदे, विठ्ठल गुरप्पा बेटजवळगे, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून नामदेव माने, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून बाबासाहेब सदाशिव गायकवाड.हमालमापाडी मतदारसंघातून पाशा आमिन शेख या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले. सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री अमित देशमुख व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील शिवसेनेचे खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करुन या निवडणूकीतील उमेदवार व निवडणूकीतील धोरण ठरविण्यात आले आहे, यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव बसवराज धाराशिवे, मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शाम भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सुभाष पवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख सतीश शिंदे, बालाजी बिराजदार, विश्वास काळे, अरुण मुकडे, काँग्रेसचे सय्यद खादर आदी उपस्थित होते. व्यापारी मतदारसंघातील दोन जागा आघाडीने व्यापारी संघटनाच्या विनंती वरुन लढविणार नसल्याचे सांगितले. या जागा व्यापारी संघटनासाठी दिल्या आसल्याचे अ‍ॅड काकडे यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS