Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा वधू-वर मेळाव्याचे आयोजन

कोपरगाव प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्हा मराठा क्रांती स्वराज संघटनेच्यावतीने रविवार 22 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत हॉटेल शांतीकमल, शिर्डी बसस

पञकार संघाच्या वतीने कोपरगाव येथे कोविड योध्दा रक्तदान शिबीर
मराठा आरक्षणासाठी कोपरगावात बेमुदत आमरण उपोषण सुरू
वडिलांच्या स्मरणार्थ गावासाठी बांधून दिला साडेपाच लाखाचा सभामंडप

कोपरगाव प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्हा मराठा क्रांती स्वराज संघटनेच्यावतीने रविवार 22 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत हॉटेल शांतीकमल, शिर्डी बसस्थानकाशेजारी, मेन रोड, शिर्डी येथे मराठा वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दीपक धट यांनी दिली.
           ते म्हणाले की, या मेळाव्याचे उदघाटन राष्ट्रीय अध्यक्ष सदानंद भोसले यांच्या हस्ते तर मराठा क्रांती स्वराज संघटनेचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. मराठा समाजाचे संघटन वाढवुन विवाह विषयक समस्या सोडविण्याचा मुख्य उददेश यातुन सफल होणार आहे. या वधू-वर परिचय मेळाव्यात मराठा समाजातील नव वधू-वर, विदुर, विधवा, घटस्फोटीत महिला किंवा पुरूष यांनी स्वतंत्र संगणकीकृत बायोडाटा, दोन पासपोर्ट साईजचे फोटो 20 ऑक्टोंबर पुर्वी प्रत्यक्ष अगर बापूसाहेब सुराळकर जिल्हा उपाध्यक्ष, भ्रमणध्वनी 986047 4440, उत्तमराव घट राहाता तालुकाध्यक्ष भ्रमणध्वनी 942316 0911, सोमनाथ राशिनकर कोपरगांव तालुका सचिव, भ्रमणध्वनी 8275522214 येथे संपर्क साधुन नोंदणी करून जमा करावेत किंवा प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी घेवुन यावे तरी जास्तीत जास्त इच्छुकांनी या मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठा क्रांती स्वराज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

COMMENTS