Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतच्या वनक्षेत्रात हरणाची शिकार

वनविभागाच्या पथकाकडून मांसासह 4 दुचाकी ताब्यात

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात शिवारात हरणाची शिकार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वनविभागाच्या (प्रादेशिक ) कर्मचार्‍या

अ‍ॅड. आंबेडकरांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा
दुचाकीची धडक बसल्याने वृद्ध महिलेचा झाला मृत्यू
कर्जत- जामखेडमधील लोकांचे व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात.. खा. सुजय विखे

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात शिवारात हरणाची शिकार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वनविभागाच्या (प्रादेशिक ) कर्मचार्‍यांनी वनक्षेत्रात जाऊन हा प्रकार रंगेहाथ पकडला. कर्मचार्‍यांनी 4 दुचाकींसह हरणाचे मांस जप्त केले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, कर्जतच्या वनविभागाचे (प्रादेशिक) वनक्षेत्रपाल मोहन शेळके यांना चिंचोली काळदात परिसरात जाळे लावून हरणाची शिकार होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वनक्षेत्रपालांनी कर्मचार्‍यांना गस्त घालण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार वनपाल सुरेश भोसले, वनरक्षक आजिनाथ भोसले, वनकर्मचारी महेश काळदाते, किसन बोबडे, ऋषिकेश लोखंडे हे कारवाईसाठी वनक्षेत्रात गेले. चिंचोली काळदात येथील फॉरेस्ट गट नंबर 412 मध्ये त्यांना एक महिला व तिच्याजवळ ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत तुकडे केलेले हरणाचे मांस आढळून आले. कर्मचार्‍यांना त्यालगतच 4 दुचाकी आढळून आल्या. त्या सर्व दुचाकी कर्मचार्‍यांनी ताब्यात घेतल्या. मात्र वनविभागाकडे महिला कर्मचारी नसल्याने आरोपी महिलेला ताब्यात घेता आले नसल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईत एमएच 42, एस 9309 (यमाहा ), एमएच 42,एडी 3645 (पॅशन प्लस)एमएच 16, सीपी 1508 (पल्सर ), एमएच 16, एयु 9427 (टीव्हीएस स्पोर्ट्स) या दुचाकी व मुद्देमाल ताब्यात घेवून पंचनामा केला.

ज्या क्षेत्रात शिकारीचा प्रकार घडला ते क्षेत्र हे पुणे वन्यजीव विभागाच्या अभयारण्य, मिरजगाव कार्यालयाअंतर्गत येत असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना वनविभागाकडून कळविण्यात आले. तसा पंचनामा वनविभागाकडून करण्यात आला. मात्र तेथील वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. शिकार झाल्याच्या ठिकाणी मी जावून आलो आहे. ते क्षेत्र वनविभाग, प्रादेशिककडे येत आहे. त्यामुळे तेच याबाबत सांगू शकतील.
यादव जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, मिरजगाव

COMMENTS