Homeताज्या बातम्यादेश

संसदेच्या सुरक्षेवरून विरोधक आक्रमक

घुसखोरीप्रकरणी 8 कर्मचार्‍यांचे निलंबन दुसर्‍या दिवशी उमटले तीव्र पडसाद

नवी दिल्ली ः संसदेची सुरक्षा भेदत दोन तरूणांनी लोकसभेत घातलेल्या गोंधळाचे तीव्र पडसाद गुरूवारी संसदेत उमटले. याप्रकरणी विरोधक खासदारांनी सरकारची

सहायक प्राध्यापक नियुक्तीसाठी पीएच.डी.ची अट रद्द
मनोज आगे यांच्या पेरुला मिळाला उच्चांकी भाव
आमदारांच्या आत्रतेवर सर्वोच्च डेडलाईन

नवी दिल्ली ः संसदेची सुरक्षा भेदत दोन तरूणांनी लोकसभेत घातलेल्या गोंधळाचे तीव्र पडसाद गुरूवारी संसदेत उमटले. याप्रकरणी विरोधक खासदारांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विरोधक खासदारांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केल्यामुळे संसदेचे काम तहकूब करण्यात आले होते. संसदेच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या मुद्द्यावर गुरुवारी दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार गदारोळ झाला. विरोधी पक्षांच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. लोकसभेच्या सभागृहात झालेल्या घुसखोरीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. सुरक्षेतील त्रुटीला जबाबदार धरत लोकसभा सचिवालयाने 8 कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे.
संसदेवरील हल्ल्याला 22 वर्षे होत असल्याच्या दिवशीच, काही तरुणांंनी संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था भेदून आता प्रवेश केला. त्यांनी संसदेच्या आवारात व लोकसभेत धूर हल्ला केला. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली. सागर शर्मा, मनोरंजन डी के, अमोल शिंदे आणि नीलम कौर यांचा आंदोलकांमध्ये समावेश होता. हुकूमशाही चालू देणार नाही अशा घोषणा आंदोलक देत होते. लोकसभेत घुसलेल्या दोघांना सुरक्षा रक्षकांनी खासदारांच्या मदतीने पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. तर, बाहेर आंदोलन करणार्‍या दोघांना संसद भवनातील सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले. त्यानंतर संसद मार्ग पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. एकूण पाच जणांनी मिळून संसदेत घुसखोरीचा कट आखल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संसद मार्ग पोलिस ठाण्यात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर गुन्हेगारी कट, परवानगीशिवाय प्रवेश, दंगल भडकवण्याच्या हेतूने चिथावणी देणे, लोकसेवकाला काम करण्यास अडथळा आणणे ही कलमे लावण्यात आली आहेत. संसद भवनातील घुसखोरीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर लोकसभेची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. संसदेतील घुसखोरीच्या प्रकरणात संशयित असलेल्या पाचव्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांनी दीड वर्षांपासून संसदेत घुसून आंदोलन करण्याची तयारी केली होती, अशी माहिती आता समोर आली आहे.

पंधरा खासदारांचे निलंबन – संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याच्या प्रकरणावरुन लोकसभेत घातलेल्या गोंधळामुळे काँगे्रसच्या 5 खासदारांसह तब्बल 15 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करताना सभागृहात असभ्य वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या अधिवेशनात आता पुढे ते सहभाग घेऊ शकणार नाहीत. या खासदारांमध्ये टीएन प्रथापन, हीबी एडेन, जोथिमनी, राम्या हरिदास , डीन कुरियाकोस, बेनी बेहानान, वीके श्रीधरन, मोहम्मद जावेद, पीआर नटराजन, कनिमोई करुणानिधि, के सुब्रमण्यन, एसआर पारथीबान, एस वेंकटेशन , मणिकम टैगोर या खासदारांचा समावेश आहे. तर राज्यसभेतून डेरेक ऑब्रायान यांना निलंबित करण्यात आले आहे.

COMMENTS