Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज आगे यांच्या पेरुला मिळाला उच्चांकी भाव

बेलापूर/प्रतिनिधी ः श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पेरु या फळास सर्वात उच्चांकीभाव मिळाला असून पत्रकार आगे यांच्या पेरुला प्रति किलो 60 रुप

कोपरगाव नगरपरिषदेच्या फंडातुन एच.आर. सिटी स्कॅनिंग मशीन त्वरीत खरेदी करावी : स्वप्नील निखाडे
गांजा व अमली पदार्थाची वाहतुक व विक्री करणारी टोळी जेरबंद
राहाता सहकारी पतसंस्थेने सभासदांना केले 15 टक्के लाभांश वाटप

बेलापूर/प्रतिनिधी ः श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पेरु या फळास सर्वात उच्चांकीभाव मिळाला असून पत्रकार आगे यांच्या पेरुला प्रति किलो 60 रुपये इतका भाव मिळाला आहे. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फळ व भाजीपाला लिलावात कांदा, डाळिंब, गवार, मेथी, कोथिंबीर यांना जादा भाव मिळत असून विशेष म्हणजे डाळिंबाबरोबरच आता पेरूनेही उचल खाल्ली असुन ज्येष्ठ पत्रकार शेतकरी मनोज कुमार आगे यांच्या शिवशंकर मळ्यातील पेरूला आज बाजार समितीत याकूबाई बागवान यांच्या लिलाव केंद्रावर विक्रीसाठी आणले होते.
विशेष म्हणजे या पेरूला रविवारी उच्चांकी भाव मिळाला आहे. 60 रुपये प्रति किलो दाराने त्यांचा पेरु विकला गेला आहे.  गेल्या आठ दिवसापासून पेरू लिलावासाठी नेण्यात येत होते. सुरुवातीला 35 रुपये दर मिळाला नंतर 40 रुपये व आज विक्रमी 60 रुपये दर मिळाला, त्यामुळे डाळिंबाबरोबरच पेरूनेही आज भाव खाल्ला. यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ पत्रकार शेतकरी मनोज आगे म्हणाले की, शेतकर्‍यांनी सर्वांनी एकाच वेळेस सोयाबीन कांदा, ऊस, गहू करणे चुकीचे असुन आपण एका पिकाला भाव मिळाला तर सर्व शेतकरी तेच पिक घेतात, त्यामुळे भाव कोसळतो. याऐवजी शेतीचे योग्य नियोजन करून, वेगवेगळी पिके घेतल्यास कमी उत्पन्नात जास्त पैसे मिळतील. माजी उपनगराध्यक्ष याकूबाई बागवान यांनी सांगितले की, आज पेरूला उंच्चांकी दर मिळाला आहे. चांगला माल असेल तर निश्‍चितच चांगला दर मिळतो,  हे आगे यांच्या पेरूवरून दिसून येते. श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनीही शेतकर्‍यांना चांगला भाव देण्यासाठी व्यापार्‍यांनी प्रमाणीक प्रयत्न करावेत असे आवाहनही व्यापार्‍यांना केले आहे.

COMMENTS