Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घर नाही म्हणणार्‍या जयंत पाटलांच्या नावावर 3 कोटींचा बंगला

2019 च्या निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती विवरणातून आकडा जाहीर

मुंबई / प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री आ जयंत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून होते. या कार्यक्रमात त्यांनी आपण कोणाकडून

कसं काय पाटील बरं हाय का ? काल दिल्लीत झालं ते खर हाय का ?
सरकार गेलेले सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर; पडळकरांची टीका
तलाठी परीक्षेतील गोंधळाची एसआयटी चौकशी करा

मुंबई / प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री आ जयंत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून होते. या कार्यक्रमात त्यांनी आपण कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. या पृथ्वीतलावर आपल्या नावावर घर नाही असे सांगितले होते. मात्र, सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील संपत्ती विवरण प्रतिज्ञापत्रात त्यांनी सांगलीत सुमारे 3 कोटी रुपयांचा बंगला असल्याची माहिती दिली आहे.
सांगली शहरातील यशवंत कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सर्वे नंबर 93550, 1351, 1352 या जागेवर आ. जयंत पाटल यांचा बंगला आहे. निवडणुकीवेळी आ. जयंत पाटील यांनी प्रतिज्ञापत्रात यांची किंमत सुमारे 2 कोटी 94 लाख 65 हजार 788 रुपये असून या बंगल्याचा मालकी हक्क स्वतःच्या नावावर असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. याशिवाय आ. जयंत पाटलांच्या नावे कासेगावमध्ये शेत जमीन आहे. तिची किंमत त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार 42,03,563 रूपये एवढी आहे. कासेगांवमध्ये अकृषी जमीन असून तिची किंमत 86,66,022 रूपये एवढी असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार जयंत पाटील यांच्याकडे एकूण अचल संपत्तीचा आकडा 4,22,35,373/- एवढी आहे. तसेच जयंत पाटलांच्या एकूण चल संपत्तीचा आकडा 12,01,61,550/- रूपये आहे.

COMMENTS