Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवाब मलिकांना सर्वोच्च दिलासा

आणखी 6 महिन्यांसाठी जामीन मंजूर

मुंबई ः राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीनावर आलेले माजी मंत्री यांना गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न

इब्राहम खानचा बाप कोण आहे हे नवाब मलिक यांनी सांगावे – नितीन चौगुले (Video)
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – नवाब मलिक (Video)
Mumbai : मंत्री नवाब मलिक यांचे खळबळजनक वक्त्यव्य

मुंबई ः राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीनावर आलेले माजी मंत्री यांना गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने मलिक यांना सहा महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे, त्यामुळे मलिकांना हा मोठा दिलासा असल्याचे बोलले जात आहे. मलिक सध्या वैद्यकीय जामीनावर बाहेर असलेले मलिकांनी पुन्हा जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात होते. परंतु, तुरुंगात असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना मूत्रपिंड विकार आणि इतर आजारांवर उपचारासाठी त्यांना 2 महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा नवाब मलिक यांनी जामीनाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाकडून त्यांची ही मागणी मान्य करत सहा महिन्यांसाठी जामीन दिला आहे. मलिकांना आधी दिलेल्या जामीनाचा कालावधी संपुष्टात येताच नवाब मलिक यांच्या वकिलांनी त्यांच्या प्रकृतीचे कारण देत अंतरिम जामीन वाढवून मिळावा अशी मागणी केली. नवाब मलिक यांच्या मुत्रपिंडाच्या आजाराबाबत तसेच त्यांच्या वैद्यकीय अहवालाबाबतचे तपशीलही न्या. बेला एम. त्रिवेदी आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आला होता. त्यानंतर खंडपीठाने मलिकांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नसल्याने अंतरिम जामिनाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. नवाब मलिकांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. यासाठी त्यांनी केवळ 55 लाख रुपये दिले होते, ज्याची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी आहे. या सगळ्यात आज प्राप्तिकर विभागाच्या पथकाने शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून त्यांच्यावर कारवाई केली होती.

COMMENTS