Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वस्तातील साखरेचा मोह पडला महागात, अडीच लाख लुटले

पुण्याच्या व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून पैसे घेतले काढून

अहमदनगर प्रतिनिधी- स्वस्तातील साखरेचा मोह महागात पडून पुण्यातील एकाला तब्बल अडीच लाखाचा फटका बसला. साखर कारखान्यातून स्वस्तात साखर मिळवून देण्य

पोलिस असल्याचे सांगून पैसे व दारु बॉक्सची मागणी
करुणा मुंडे राजकारणात उतरून धनंजय मुंडेंविरोधात लढणार…; नगरला केली शिवशक्ती सेना पक्षाची घोषणा
जागतिक विमा परिषदेसाठी धनश्री कडलग यांची निवड

अहमदनगर प्रतिनिधी- स्वस्तातील साखरेचा मोह महागात पडून पुण्यातील एकाला तब्बल अडीच लाखाचा फटका बसला. साखर कारखान्यातून स्वस्तात साखर मिळवून देण्याचे आमीष दाखवत पुणे येथील एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून दोन लाख 54 हजार रुपयांना लुटले. नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारातील रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली.

श्रीकांत सुधीर जोशी (वय 47, रा.आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) असे लुटलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर धनराज (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व त्याच्यासोबत असलेला अनोळखी व्यक्ती (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी जोशी हे व्यावसायिक असून त्यांना सागर धनराज नावाच्या व्यक्तीने नगरजवळ सारोळा कासार परिसरात साखर कारखाना असून या कारखान्यातून तुम्हाला स्वस्तात साखर मिळवून देतो, असे आमीष दाखवले. त्या आमीषाला भुलून फिर्यादी जोशी हे अडीच लाखाची रोकड घेऊन सारोळा कासार येथे आले. यावेळी दोघांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील दोन लाख 50 हजाराची रोकड, 1 सॅमसंग कंपनीचा मोबाईल, चांदीची अंगठी व पाकिटातील 250 रुपयांची रोकड असा दोन लाख 54 हजार 450 रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला. पोलिसांनी श्रीकांत जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर धनराज व त्याच्याबरोबर असलेल्या एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 392, 420 प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहे. सोन्याचे आमीष दाखवून पैसे घेऊन आलेल्यांना लुटण्याचे प्रकार नेहमी नगर जिल्ह्यात होतात. या पार्श्‍वभूमीवर, नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे स्वस्तातील साखरेचे आमीष दाखवून झालेल्या लूटमारीने परिसरात खळबळ उडाली आहे.

COMMENTS