Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आगीत नऊ माणसांसह चार जनावर होरपळले

गॅस गळतीने लागली आग ; राहाता तालुक्यातील एकरूखे गावातील घटना

राहाता ः तालुक्यातील एकरुखे गावातील भाऊसाहेब वायकर यांच्या घरात नवीन गँस टाकी लावण्यासाठी त्याचे पांढरे झाकण उघडताच त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस ग

अहमदनगरच्या संदलमध्ये झळकले औरंगजेबाचे पोस्टर
कॉँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळे नगर शहराचे आमदार होतील
संजीवनी पॉलिटेक्निकच्या १७ विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत नोकरी; कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यश

राहाता ः तालुक्यातील एकरुखे गावातील भाऊसाहेब वायकर यांच्या घरात नवीन गँस टाकी लावण्यासाठी त्याचे पांढरे झाकण उघडताच त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरु झाली. ही बाब भाऊसाहेब वायकर यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी गँस गळती रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ही गळती सुरूच राहिली. त्यामुळे त्यांनी गँस टाकी घराबाहेर आणत त्यावर पाणी फेकले. मात्र गँसचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला. व हा गॅस घराबाहेर असलेल्या चुलीपर्यंत पोहचल्याने गँसने पेट घेतला. त्यामुळे आसपास असलेले नऊ जण आणि चार जनावरे होरपळ्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भाऊसाहेब गंगाधर वायकर, सुरेश भाऊसाहेब वायकर, विमल वायकर, अनुजा वायकर, सृष्टी  वायकर, नारायण वायकर, विनया वायकर, पूजा विप्रदास, यश विप्रदास हे नऊजण आग्नीने होरपाळल्याने त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवत त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. तर जनावरांणा राहाता येथिल पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन वेंदे व पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.नितिन निर्मळ यांनी त्वरीत घटनास्थळी येत उपचार केले. तर यामध्ये भाऊसाहेब वायकर हे गँस गळती होत असलेले सिलेंडर घरा बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांचा पाय अडकल्याने त्यांचा पाय मोडला असुन त्यांच्यावर देखिल लोणी येथिल प्रवारा रुग्नालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पा.यांनी या जखमींची त्वरीत रुग्नालयात जावुन भेट घेतली असुन वैद्यकीय अधिकार्‍यांची देखिल चर्चा करुन त्यांच्या प्रकृती विषयी माहीती घेतली आहे. तर याप्रसंगी एकरुखे येथील सरपंच जितेंद्र गाढवे, गणेश कारखान्याचे संचालक अनिल गाढवे, कृषी उत्पन्न बाजार समीती संचालक जालिंदर गाढवे कृषी उत्पन्न बाजार समिती मा. संचालक  देवेंद्र भवर, सोपान कासार, अनिल गाढवे, विनोद गाढवे,राजेंद्र वायकर, विजय वायकर यांनी घटनास्थळी त्वरीत येवुन जखमींना उपचारासाठी हलविण्यास मदत केली.

COMMENTS