निघोज: श्री क्षेत्र पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या श्री संत निळोबाराय पालखी सोहळ्याची गुरुपौर्णिमेनिमित्त ह.भ.प. माऊली महाराज खामकर यांच

निघोज: श्री क्षेत्र पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या श्री संत निळोबाराय पालखी सोहळ्याची गुरुपौर्णिमेनिमित्त ह.भ.प. माऊली महाराज खामकर यांच्या कीर्तनाने उत्साहात सांगता झाली. या प्रसंगी हजारो वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कीर्तनात मार्गदर्शन करताना ह.भ.प. माऊली महाराज खामकर यांनी वारी ही केवळ भक्तीची नव्हे, तर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचीही एक मोठी चळवळ असल्याचे सांगितले. प्रत्येक वारकऱ्याने किमान एक झाड लावून ‘हरित वारी’चा संकल्प करावा, तसेच निसर्ग संरक्षणासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यासोबतच भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे अनन्यसाधारण महत्त्वही त्यांनी आपल्या कीर्तनातून विशद केले.
या सांगता सोहळ्यास गोपाळपूरचे सरपंच लक्ष्मण महाराज, निळोबाराय पालखी सोहळा प्रमुख गोपाळकाका मकाशीर, निळोबाराय देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत, ह.भ.प. भोसुरे महाराज, ह.भ.प. कौठाळे महाराज, विणेकरी झुंबर रासकर, मारुती रासकर, गंगाधर मुळे, गहिनाथ लोंढे, महिला प्रमुख गीतांजली चोपडा, शिवाजी चोपडा, बाळासाहेब सावंत, अनिल पोटे यांच्यासह बहुसंख्य वारकरी उपस्थित होते.
“वारी ही स्वच्छ आणि हरित असावी. प्रत्येक वारकऱ्याने किमान एक झाड लावून निसर्ग संवर्धनासाठी योगदान द्यावे. आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प करावा.”
— ह.भ.प. माऊली महाराज खामकर

COMMENTS