Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

जालना ः मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी मनोज जरांगे यांनी 10 फेबु्रवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

मनोज जरांगे यांची संगमनेरमध्ये आज जाहीर सभा
मनोज जरांगे पाटलांनी लुटला क्रिकेटचा आनंद
मला तडीपार करण्याचा फडणवीसांचा डाव

जालना ः मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी मनोज जरांगे यांनी 10 फेबु्रवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. पाण्याचा घोट देखील घेत नसल्यामुळे बुधवारी पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. नाकातून रक्तस्त्राव होत असून, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्यामुळे मनोज जरांगे यांच्या तब्बेतीची चिंता वाढली आहे.

 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत सुरु केलेल्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मागील 5 दिवसांत त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे. मंगळवारी मनोज जरांगे यांचे हात थरथरत होते, बोलण्यास देखील त्रास होत आहे. त्यामुळे त्यांची अशी सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या सहकार्‍यांची चिंता वाढली आहे. मनोज जरांगे पाटलांची तब्येत चिंतजनक होताच, त्याचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरूवात झाली आहे. काल रात्री जालना-जळगाव रोडवर टायर जाळण्यात आले. बुधवारी हिंगोलीमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. लातूर, उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ एक मोठी रॅली काढण्यात येणार आहे. तर मालेगावमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत. शिंदे, फडवणीस आणि पवार काय सरकार चालवत आहेत? सग्यासोयर्‍याची अंमलबजावणी, हैदराबाद गॅझेट आणि शिंदे समितीला एक वर्ष मुदत देत असाल तर इकडे यायचे. तुम्ही 15, 16 तारखेनंतर मज्या बघा. दोन दिवसांत अधिवेशन घेणार होते. घेतलं का? डबल रोल करू नका. मराठे काय आहेत ते तुम्ही 15, 16 तारखेनंतर बघा, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

मराठा संघटनांची बंदची हाक – मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी बुधवारी बंदची हाक दिली होती. जालना, बीड, सोलापूर आणि नाशिकमधील अनेक गावांमध्ये बंद पाळण्यात आला. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उत्तर सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाज बांधवाकडून सोलापुरातील कोंडी गावात ही बंद पुकारला आहे. गावात सकाळपासून सर्व दुकाने बंद, केवळ दूध आणि अत्यावश्यक सेवा सुरु आहे. सरकारने दिलेला शब्द पाळत आरक्षणाची अंमलबजावणी करावी, मराठा बांधवाची भूमिका आहे.

जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झाला ः नारायण राणे – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी मनोज जरांगे यांच्यावर कडवट हल्ला चढवला आहे. राणे यांनी पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, ’मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव, तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत अशी टीका केली आहे.

COMMENTS