Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निलेश लंके आज आमदारकीचा राजीनामा देणार

अहमदनगर प्रतिनिधी - पारनेरचे आमदार निलेश लंके आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या राजीनाम्यामुळे ते

आपण पवार कुटुंबियासोबतच राहणार
टक्केवारी घेतल्याचे सिद्ध करा, नाहीतर तुम्ही राजीनामे द्या
 निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करणार ?

अहमदनगर प्रतिनिधी – पारनेरचे आमदार निलेश लंके आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या राजीनाम्यामुळे ते अहमदनगर लोकसभा मतदार संघांची निवडणूक महाविकास आघाडीकडून लढणार हे निश्चित होणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी लंके यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपण त्यांच्या विचाराचे असल्याचे सांगितले होते. शरद पवार गटाकडून लंके हे अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचेही संकेतही मिळत होते. लंके या मतदारसंघात अनेक दिवसांपासून सक्रियही आहेत. मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाची व उमेदवारीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. पक्षांतर बंदी कायद्याची बाधा येऊ शकते त्यामुळे लंके यांनी मौन बाळगले होते. मात्र आता ते राजीनामा देऊन अधिकृतपणे रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे. आज दुपारपर्यंत ते विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

COMMENTS