‘एमआयएम’ आणि आघाडीचा अन्वयार्थ

Homeताज्या बातम्यासंपादकीय

‘एमआयएम’ आणि आघाडीचा अन्वयार्थ

राज्यात भाजप सत्तेवर येण्यासाठी आसुसलेली असतांनाच, होळीच्या दिवसापासून सुरू झालेली राजकीय वक्तव्याची राजकीय धुळवड जोरात सुरू आहे. एमआयएमने महाविकास आ

समस्येचे नशीब
चीनची कुरघोडी
अन्यथा मरण अटळ

राज्यात भाजप सत्तेवर येण्यासाठी आसुसलेली असतांनाच, होळीच्या दिवसापासून सुरू झालेली राजकीय वक्तव्याची राजकीय धुळवड जोरात सुरू आहे. एमआयएमने महाविकास आघाडीसोबत युती करण्याचे वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी करून, महाराष्ट्राच्या राजकारणात एक धुरळा उडवून दिला. वास्तविक पाहता हा एक राजकीय अंदाज घेण्याचा काही चाणक्यांचा हेतू होता, आणि तो अंदाज त्यांनी घेतला आहे. राजकीय नेत्यांच्या वक्तव्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. त्याचा भावार्थही घ्यायचा नसतो. बिटवीन द लाईन अर्थ शोधायचा असतो. काही नेत्यांच्या वक्त्यांचा, त्यांच्या संकेताचा भल्याभल्यांना अर्थ लागत नाही. तसाच अंदाज या खेळीचा भल्या भल्यांना आला नाही.
शिवसेना हा पक्ष आपल्या कडव्या विचारासाठी म्हणजे हिंदुत्ववादासाठी प्रसिद्ध आहे. तोच त्या पक्षाचा बेस आहे, त्याच विचारावर शिवसेना वाढली. मात्र जर एमआयएम जर महाविकास आघाडीसोबत आली तर, शिवसेनेचा हा बेस गळून पडेल, हे महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रस बर्‍याच अर्थाने एमआयएमसोबत युती करण्यास अनुकूल असली तरी शिवसेना तयार होईल, असे नाही. आणि रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका ठणकावून सांगितली. यानिमित्ताने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यादांच जाहीर भूमिका घेतली असावी. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून तब्बेतीच्या कारणामुळे ते बाहेर आलेले नाही. राज्यात अनेक राजकीय उलथापालथ, ईडीचे छापे, आयकरच्या धाडी सुरू असतांना ठाकरे यांनी त्याविषयी कधी तक्रारीचा सूर लावला नाही. पक्षातील स्वकीय अडचणीत आले असतांना देखील संजय राऊत एकटे किल्ला लढवत राहिले, मात्र मुख्यमंत्री ठाकरे समोर आले नव्हते. मात्र एमआयएमचा प्रस्ताव समोर आल्यानंतर ते समोर आलेत. शिवाय त्यांनी पक्षासोबत दीर्घवेळ बैठक घेत, एमआयएमचा आघाडीमध्ये प्रवेश घडवून आणण्यास भाजप इच्छूक असून, त्यांचा तसा डाव आहे. हा डाव उधळून टाका असे देखील त्यांनी आपल्या खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना बजावले आहे. शिवसेनेसोबत जर एमआयएम आलीच, तर भाजप शिवसेनेचे हिंदुत्व हायजॅक करण्यास मोकळी. म्हणजे, शिवसेनेचा उरला-सुरला जनाधार भाजप आपल्याकडे खेचण्यास सुरूवात करतील. त्यामुळे शिवसेनेचे उलट खच्चीकरणच होईल. शिवाय आघाडीतील तीन पक्ष एकत्र राहतील याची शाश्‍वती नाही. एमआयएमचा प्रस्ताव आघाडीतील नेत्यांनी फेटाळला असला तरी, जलील म्हणाले की, आपण जे करणार आहोत ते भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी आहोत. आधी तुम्ही आम्हाला म्हणायचे की आम्ही भाजपला लपून मदत करतो. आता आम्ही तुमच्याकडे येत आहोत तर तुम्ही आता दूर करत आहात. हे दुर्दैवी आहे. भाजपकडे सर्व यंत्रणा हातात आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे. सर्वांनी एकत्रपणे येऊन भाजपचा विरोध केला पाहिजे. त्यामुळ आम्ही हा प्रयत्न केला. पुढेही आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, अस ते म्हणाले.
एमआयएमसोबत सर्वात प्रथम 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्यावेळी वंंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी युती केली होती. राज्यात हा एक नवा प्रयोग होता. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत वंचित आघाडीला म्हणावा तसा फायदा झाला नाही, मात्र त्याचा फायदा एमआयएमला नक्कीच झाला. त्यानंतर आता बाळासाहेब आंबेडकर अनेक वेळेस म्हणाले आहेत की, यापुढे भविष्यात काँगे्रससोबत जाऊ मात्र एमआयएमसोबत कदापी नाही. का जाणार नाहीत, याचा मोठयाप्रमाणात त्यांनी उहापोह केला नसला, तरी त्यांना आलेले अनुभव, पक्षाची झालेली पीछेहाट, मतांचे धुव्रीकरण यामुळे त्यांनी भविष्यात एमआयएमसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. वास्तविक पाहता, एमआयएम जर वाढली, तर त्याचा फायदा कुणाला होणार आहे, आणि कोणत्या पक्षांच्या मतांची टक्केवारी घसरणार आहे, याचा आलेख बघावा लागेल. याचा मोठा फटका शिवसेनेलाच बसू शकतो, हे उघड आहे.

COMMENTS