Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदूत्वाची अ‍ॅलर्जी असलेल्याविरोधात उठाव

मुख्यमंत्री शिंदे यांची ठाकरे गटावर टीका

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः अयोध्येतील राम मंदिराला ज्यांनी विरोध केला, अशा विचारधारेच्या पक्षांसोबत उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले. मात्र, आम्ही हिंदूत्व

अजित पवार यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 
शिंदे गटाच्या दसरा मेळावा खर्चाची होणार चौकशी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः अयोध्येतील राम मंदिराला ज्यांनी विरोध केला, अशा विचारधारेच्या पक्षांसोबत उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले. मात्र, आम्ही हिंदूत्वाची अ‍ॅलर्जी असलेल्याविरोधात उठाव करत, ही चूक 8 महिन्यापूर्वी दुरुस्त केली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 40 आमदार आणि 13 खासदारांसह भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोथ्या येथील प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राम प्रभुचे दर्शन घेतले याचा मोठा आनंद आहे. येथून ऊर्जा, प्रेरणा घेऊन आम्ही महाराष्ट्रात जाऊ. महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. बळीराजावरचे संकट दूर व्हावे, राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस यावेत हीच मागणी रामलल्लाच्या चरणी केल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.  प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, काही जणांना हिंदुत्वाची अ‍ॅलर्जी आहे. त्यामुळेच ते आमच्या अयोध्या दौर्‍यावर टीका करत आहेत, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले आहे. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात रावणराज्य असल्याची टीका काही जण करत आहेत. महाराष्ट्रात साधू-संतांची हत्या झाली ते काय रामराज्य होते का?, असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्रभवन उभारणार, अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच उत्तर भारतीय आणि महाराष्ट्र वेगळे नाही, असेही शिंदे यावेळी म्हणाले. अयोध्येतील महाराष्ट्र भवनामुळे रामाच्या दर्शनासाठी येणार्‍या महाराष्ट्रातील भाविकांची मोठी सोय होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अयोध्या शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्री, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार यासह स्थानिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्रीफडणवीस यांनी अयोध्येतील मंदिरात जाऊन प्रभू श्री रामचंद्र यांचे दर्शन घेतले. तसेच त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यानंतर उभयतांनी अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिर परिसराला भेट देऊन बांधकामाची पाहणी  करून त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. याप्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, कामगार मंत्री सुरेश खाडे, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत यासोबतच खासदार राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, कृपाल तुमाणे, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे आदी उपस्थित होते.

स्वप्नपूर्ती झाली ः उपमुख्यमंत्री फडणवीस – प्रभू रामाचे दर्शन घेऊन आनंद झाला आहे. एक स्वप्न पूर्ण झाले आहे. प्रभू रामाकडे काही मागायची गरज नाही सगळे मिळत असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंदिर पूर्ण झाल्यानंतर मी परत येईलच असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले – अयोध्येत रविवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अयोध्येत राम मंदिर बनावे हे बाळासाहेब ठाकरे व लाखो रामभक्तांचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. भाजप आणि शिवसेनेचे विचार एकच आहे. मात्र, काही जण जाणीवपूर्वक दोन्ही पक्षांत मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जण धनुष्यबाणावरुन आमच्यावर टीका करत आहेत. शिवधनुष्यबाण हे प्रभू श्री रामाचे आहे. त्यामुळे धनुष्यबाणावर टीका करुन ते प्रभू श्री रामाच्या धनुष्यबाणाचा अपमान करत आहेत. ज्यांनी राममंदिराला विरोध केला त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले. सत्ताच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरेंनी चुकीचा निर्णय घेतला. आम्ही ही चूक दुरुस्त केल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी यावेळी केला.

COMMENTS