Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ध्रुव ग्लोबल स्कूलची उज्ज्वल निकालाची पंरपरा कायम

जिल्ह्यात मारली बाजी ; वाकचौरे, कासार, शेळके व शिंदे चमकले

संगमनेर/प्रतिनिधी ः नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अभ्यासक्रमाच्या (सीबीएसई) दहावी व बारावीच्या परीक्षेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद

राज्यात अतिवृष्टीचे 84 बळी
 मानोरीत सेवानिवृत्त शिक्षकाची आत्महत्या
वाळू पकडायला गेले आणि दमदाटी अनुभवली

संगमनेर/प्रतिनिधी ः नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अभ्यासक्रमाच्या (सीबीएसई) दहावी व बारावीच्या परीक्षेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यानी जिल्ह्यात बाजी मारली आहे. शाळेने यंदाही आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखतांना इयत्ता दहावीच्या जय वाकचौरे व श्रेयान कासार यांनी प्रत्येकी 98 टक्के गुण मिळवतांना जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, ध्रुवच्याच संस्कृती दत्तू शेळके (97.80 टक्के) व श्रीशा विराज शिंदे (97.40 टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवतांना ध्रुव ग्लोबलच्या यशाची पताका फडफडती ठेवली आहे.
याशिवाय श्रीरंग नाझीरकर, अद्वैत तळणीकर, तनया गाडे, अनय नवले, अमनदीप आरोटे, गायत्री घुले, पृथ्वीराज देशमुख, जय बेनके, साईतेज सानप, समृद्धी कर्पे, कृष्णा दिवटे, निषाध विखे, यश डामसे, जीया बाफना, ओम शिंदे, ऋतुजा बेनके, साई वाकचौरे, पार्थ चोथवे, मोहित मंगवानी, अद्वय जोशी, ओम कानवडे, तनय डावरे, दिव्या देशमाने व कृष्णा आरोटे या विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळवले. बारावी वाणिज्य विभागातही यशाचा सिलसिला कायम राखतांना संस्कृती गणोरे (91.6 टक्के), वैष्णवी गोवर्धने (88.2 टक्के), प्रिन्सेस नादार (87.8 टक्के), अमनदीपसिंग पंजाबी (87.6 टक्के), भूमी खुटेटा, सिद्धी साठे आणि  युगंधर भुजाडी (दोघेही 87 टक्के) यांनी अनुक्रमे पहिला ते पाचवा क्रमांक पटकावला. तर, ओम घुले याने शारीरिक शिक्षण या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS