सातारा जिल्ह्यासाठी 1 लाख 17 हजार 730 मेट्रिक टन खत; 44 हजार 535 क्िंवटल बियाण्यांची मागणी

Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा जिल्ह्यासाठी 1 लाख 17 हजार 730 मेट्रिक टन खत; 44 हजार 535 क्िंवटल बियाण्यांची मागणी

खरीप हंगाम 2021 साठी जिल्ह्याला 1 लाख 17 हजार 730 मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले असून 44 हजार 535 क्िंवटल बियाणांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.

प्रभाग रचना बदलल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार
मीराबाई चानूची रौप्यपदकाची कमाई
सातारा बँक निवडणुकीत सातारचे दोन्ही राजे बिनविरोध; 11 संचालक बिनविरोध


सातारा / प्रतिनिधी : : खरीप हंगाम 2021 साठी जिल्ह्याला 1 लाख 17 हजार 730 मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले असून 44 हजार 535 क्िंवटल बियाणांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात झाली. यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, आ. अरुण लाड, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा अधीक्षक कृषी गुरुदत्त काळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. खरीप हंगामात शेतकरी खते व बियाणांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक बंधने आली तरी राज्यासह देशात कृषी उत्पन्न वाढले आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील सोयाबीन विकला आहे. तरी शेतकर्‍यांना सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करुन देण्यावर कृषी विभागाने भर द्यावा. तसेच खतांचा अधिकचा स्टॉक करुन ठेवावा, अशा सूचनाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बैठकीत केल्या.

COMMENTS