नांदेड : लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा विधिमंडळ उपविधान समितीचे प्रमुख प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नांदेड येथील संपर्क कार्यालया

नांदेड : लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा विधिमंडळ उपविधान समितीचे प्रमुख प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नांदेड येथील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व प्रमुख पदाधिकार्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांशी समन्वय साधणे तसेच निवडणुकीची रणनीती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज होटाळकर, प्रदेश सरचिटणीस प्रविण चिखलीकर, शहर कार्याध्यक्ष माधव पावडे, नागनाथ घिसेवाड यांच्यासह विविध नगरपालिकांतील पदाधिकारी उपस्थित होते. तसेच लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष शरद पवार, देगलूर नगरपालिकेचे प्रतिनिधी बालाजीराव टेकाळे, उमरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष कैलास देशमुख गोरठेकर, लोहा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करीम शेख, कंधार नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, माजी नगराध्यक्ष स्वप्नील लुंगारे, लक्ष्मीकांत पदमवार, उपनगराध्यक्ष अंकुशराव देसाई, माजी उपनगराध्यक्ष जफरोद्दिन बाहोदिन, डॉ. विठ्ठलराव कुडमूलवार, दत्ता वाले तसेच नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे नगरसेवक साबेर चाऊस, हबीब बावजीर, सचिन नाईक, भास्कर पवार, श्रीनिवास नरवाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

COMMENTS