बीड शहरातील वार्ड क्रमांक 19, 20, 21 व 22 मधील नागरिकांसाठी एसआयआर (विशेष सखोल उजळणी) गणना फॉर्म भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवा

बीड शहरातील वार्ड क्रमांक 19, 20, 21 व 22 मधील नागरिकांसाठी एसआयआर (विशेष सखोल उजळणी) गणना फॉर्म भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान करण्यासाठी जयहिंद कॅम्पस, मिलतनगर, बीड येथे शनिवार (11 जुलै) ते रविवार (12 जुलै 2026) या दोन दिवसांच्या कालावधीत विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हा कॅम्प दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
या कॅम्पमध्ये नागरिकांना बीएलओ यांच्या माध्यमातून एसआयआर गणना फॉर्म भरून घेणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घेणे तसेच मतदार यादीसंदर्भातील विविध शंकांचे निरसन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये, हा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा जनहिताचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी आमदार विजयसिंहराजे पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे, मुख्याधिकारी श्री. मांडुरके तसेच संबंधित वार्डांतील सर्व लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक यांचे सहकार्य लाभत असून, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना स्वच्छता व आरोग्य सभापती तथा नगरसेवक शेख निजाम जैनुद्दीन यांनी सांगितले की, लोकशाही व्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळ न दवडता या विशेष कॅम्पचा लाभ घ्यावा. मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणून डखठ गणना फॉर्म भरावा. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत एसआयआर आणि कॅम्पमधील कर्मचार्यांच्या मार्गदर्शनाखालीच प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यांनी आवाहन केले. या विशेष कॅम्पमुळे वार्डातील हजारो नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होणार असून, फॉर्म भरण्यासाठी होणारी धावपळ आणि वेळेचा अपव्यय टळणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येणार्या या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन शेख निजाम जैनुद्दीन, नगरसेवक सय्यद सादिक अली, बाळासाहेब गुंजाळ, शेख खय्युम इनामदार, सय्यद इलियास, मनोज गोडसे, दत्ता जाधव आणि शेख रईस यांनी केले आहे. तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबीय, नातेवाईक आणि शेजार्यांनाही या विशेष कॅम्पची माहिती देऊन त्यांनाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले असून, नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS