Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंथन परीक्षेत नागवडे इंग्रजी माध्यमांचा डंका

श्रीगोंदा शहर ः मंथन वेल्फेअर फाउंडेशन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या मंथन जनरल नॉलेज एक्झामिनेशन मध्ये तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव

नर्णय झाला तोच दर बाजार समित्यांनीही द्यावा ः उत्तम पुणे
जनतेने सरकारी रुग्णालयांवर विश्‍वास ठेवायचा की नाही?
महामानव डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीयांकडून अभिवादन..

श्रीगोंदा शहर ः मंथन वेल्फेअर फाउंडेशन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या मंथन जनरल नॉलेज एक्झामिनेशन मध्ये तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डेफोडील्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शिवाज्ञा नागवडे-राज्यात 5 वा क्रमांक, अनन्या गारूडकर-केंद्रात प्रथम-राज्यात 26वा क्रमांक, उत्कर्षा कुरुमकर-केंद्रात तृतीय-राज्यात 50वा क्रमांक, चिराग मखरे – केंद्रात प्रथम-राज्यात 57 वा क्रमांक, श्रेयश पांडुळे-केंद्रात प्रथम-राज्यात 24वा क्रमांक, सई सुपेकर – केंद्रात प्रथम-राज्यात 43 वा क्रमांक विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची लहान वयापासूनच तयारी व्हावी या उद्देशाने विद्यालयांमध्ये प्रि – प्रायमरी पासूनच मंथन, ओलंपियाड, अबॅकस, एन.एस.इ. यासारख्या स्पर्धा परीक्षांचा नियमितपणे अभ्यास घेतला जातो, अशी माहिती यावेळी निरीक्षक एस.पी. गोलांडे यांनी दिली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या मंथन विभाग प्रमुख राजश्री नागवडे यांच्यासह प्रा. राहुल भांडवलकर तसेच विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS