Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परळी बस स्थानकातील हिरकणी कक्षाची दुरावस्था

बीड प्रतिनिधी - बीडच्या परळी बस स्थानकातील हिरकणी कक्षाची मोठी दुरावस्था झालीय. या ठिकाणचे हिरकणी कक्ष आता केवळ नावालाच उरले आहे. हिरकणी कक्षाच

आंतरराष्ट्रीय मल्ल घडविण्याचा प्रयत्न : आ. जयंत पाटील
निळवंडे कालव्यांच्या कामांची अभियंता बाळासाहेब शेटे यांनी केली पाहणी
रस्ते अपघातांची भीषणता मानवी चुकांमुळे !

बीड प्रतिनिधी – बीडच्या परळी बस स्थानकातील हिरकणी कक्षाची मोठी दुरावस्था झालीय. या ठिकाणचे हिरकणी कक्ष आता केवळ नावालाच उरले आहे. हिरकणी कक्षाच्या दुरावस्थेमुळे स्तनदा मातांना अडचणींचा सामना करावा लागतोय. परळी शहरातील हे बस स्थानक मध्यवर्ती ठिकाणी असून प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दररोज जिल्हाच नाही तर परराज्यातील भाविक दर्शनासाठी इथे येत असतात. त्यामुळे बस स्थानक नेहमीच गजबजलेलं राहतं. मात्र या ठिकाणच्या बस स्थानकाची दुरावस्था आहेच. परंतु आता हिरकणी कक्षाची देखील दयनीय अवस्था झालीय. ज्या कंत्राटदाराला स्वच्छतेचं टेंडर दिलंय. त्याच्याच हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं आगार प्रमुखांनी सांगितले आहे.

COMMENTS