कर्जतमध्ये टेम्पो अंगावर घालून जावयाचा खून

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमध्ये टेम्पो अंगावर घालून जावयाचा खून

कर्जत/प्रतिनिधी: लहान मुलाला सोबत घरी घेवून जाण्याची विनंती करण्यासाठी गेलेल्या जावयाचा खून झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील कौडाणे येथे घडली आहे. गुर

गुटका-मावा माफियांना पोलिसांचा दणका, 10 लाखाचा माल जप्त;11 जणांना केली अटक
बेलापूर महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट उत्साहात
ब्राह्मणगाव उपकेंद्राला आरोग्य मंत्रालयाच्या मुख्य सचिवांची भेट

कर्जत/प्रतिनिधी: लहान मुलाला सोबत घरी घेवून जाण्याची विनंती करण्यासाठी गेलेल्या जावयाचा खून झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील कौडाणे येथे घडली आहे. गुरुवारी (दि. २६) दुपारी १ वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये सात जणांविरुद्ध  खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दत्तात्रय जानू मुळे ( वय : ३८) हे कौडाणे येथे मुलाला नेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी सासरकडील नातेवाईकांना मुलाला सोबत पाठवण्याची विनंती केली. त्यावेळी रविंद्र बाबासाहेब सुद्रिक, बाबासाहेब दत्तात्रय सुद्रीक, नरेंद्र सदाशिव सुद्रीक, विठ्ठल सदाशिव सुद्रीक, अमोल बाबासाहेब सुद्रीक, सदाशिव दत्तात्रय सुद्रीक सर्व रा. मुळेवाडी ता. कर्जत यातील दोघांनी मुळे यांना संगनमत करुन चापटाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना जमिनीवर आपटले व कोणीतरी टेम्पो चालक विनोद प्रशांत गोल्हार, रा. कापशी, ता. आष्टी, जि. बीड यांना टेम्पोने ठोस मारण्याची चिथावणी दिली.  त्यावेळी चालकाने टायर अंगावर नेवून डोक्यात व छातीस गंभीर दुखापत करून त्यांना जिवे मारले.  या प्रकरणी सुनिल मुळे यांनी ७ आरोपींविरुद्ध कलम ३०२, ३२३, १०९ व ३४ या प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गावित यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सतिश गावित करत आहेत.

COMMENTS