Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी कॉलेजमधील शेकडो झाडांना आस पाण्याची

राहुरी ः राहुरी कॉलेज माहिती नाही असा कोणी नसेल ! या कॉलेजची कॅक्टस गार्डन महाराष्ट्राला परिचित आहे . मात्र याच कॅक्टसगार्डनच्या परिसरातील शेकडो

गांधी हम शर्मिनदा है तेरे कातिल जिंदा है  | LokNews24
पेट्रोलचे भाव रेकॉर्ड स्तरावर, दर शंभरी गाठण्याच्या मार्गावर | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24*
बैलाने मारल्याने ऊस तोडणी कामगाराचा मृत्यू

राहुरी ः राहुरी कॉलेज माहिती नाही असा कोणी नसेल ! या कॉलेजची कॅक्टस गार्डन महाराष्ट्राला परिचित आहे . मात्र याच कॅक्टसगार्डनच्या परिसरातील शेकडो झाडे जळण्याच्या मार्गावर आहेत, केवळ पाण्याअभावी. या राहुरी कॉलेजच्या परिसरात कॉलेज च्या सहकार्यातून माजी विद्यार्थ्यांनी शेकडो झाडांचे वृक्षारोपण यापूर्वी केलेले आहे.
मध्यंतरीच्या काळात ही वृक्ष संपदा दमदारपणे चांगलीच बहरलेली होती . महाविद्यालयाच्या सहकार्यातून विद्यार्थी या ठिकाणी स्प्रिंकल किंवा अन्य साधनाद्वारे पाणी द्यायचे . कॉलेजच्या बोअरच्या माध्यमातून देखील पाणी देण्यात येत असे. 1993 – 94 च्या काळात या ठिकाणी खडकाळ माळरानावर राहुरी कॉलेज उभारल्यानंतर या ठिकाणी माजी विद्यार्थी, तत्कालीन प्राध्यापक वृंद यांनी परिसर बहरला जावा म्हणून व आठवण राहावी म्हणून या ठिकाणी वृक्षारोपण करायला सुरुवात केली. ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे हे त्यावेळी शिक्षण मंडळावर असताना त्यांच्या पुढाकार्याने देखील मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यामुळे राहुरी कॉलेज निसर्गरम्य वातावरणात असल्याचे ख्याती सर्वत्र झालेली आहे. मात्र अलीकडच्या काळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेकडो झाडे अक्षरशः वाळून गेली आहेत, अनेक झाडे जळून चाललेली आहेत . उन्हाच्या तीव्रतेमुळे ही झाडे जळत चालली असून या झाडांना पाण्याची आवश्यकता आहे. महाविद्यालयात सध्या सुट्टी असल्याने या शेकडो झाडांना पाणी कोण घालणार ? हा प्रश्‍न चिंता करणारा आहे. या शेकडो झाडांना जगविण्यासाठी स्वयंसेवी संस्था किंवा पर्यावरण प्रेमींनी पुढे येण्याची आवश्यकता व्यक्त केली जात असून, ही झाड जगण्याची आस म्हणून पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

COMMENTS