उपक्रमशिल शिक्षकांमुळे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावला – डॉ . संजय कळमकर

Homeताज्या बातम्याशहरं

उपक्रमशिल शिक्षकांमुळे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावला – डॉ . संजय कळमकर

संगमनेर/प्रतिनिधी शिक्षक आपली प्रतिभा वापरुन प्राथमिक शाळेत विद्यार्थीहिताचे अनेक कल्पक उपक्रम राबवत आहेत त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उं

Ahmednagar : सावेडीत चक्क रिक्षातून आली मिस इंडिया उपविजेती मान्या सिंह (Video)
डीवायएसपी संदीप मिटके यांच्यावर गोळीबार… ‘असा’ घडला थरार… (Video)
शेकडो युवक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

संगमनेर/प्रतिनिधी

शिक्षक आपली प्रतिभा वापरुन प्राथमिक शाळेत विद्यार्थीहिताचे अनेक कल्पक उपक्रम राबवत आहेत त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द साहित्यिक व शिक्षक नेते डॉ . संजय कळमकर यांनी केले. संगमनेर तालुका गुरुकुल मंडळ व शिक्षक समितीने विविध संस्थांकडून आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान केला. 

याप्रसंगी अध्यक्षपदावरून कळमकर बोलत होते. जिल्हा परिषदेचे गटनेते अजय फटांगरे, समितीचे राज्य उपाध्यक्ष रा.या. औटी, गटशिक्षणाधिकारी के. के. पवार, गुरुकुल महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वृषाली कडलग, गुरुकुलचे जिल्हा कार्याध्यक्ष सुखदेव मोहिते, मच्छिंद्र दळवी,  गोकुळ कहाणे, संभाजी फड, मधूकर मैड, बंडू हासे, ज्ञानेश्वर नागरे, भागवत कर्पे आदिव्यासपीठावर उपस्थित होते.          

डॉ. कळमकर म्हणाले, पुरस्कार कुठला आहे याला महत्त्व नसते. त्यातून आपली काम करण्याची दिशा योग्य आहे ते समजते आणि प्रेरणा मिळते. स्वत: चे पैसे घालून शिक्षक आपल्या शाळा अंर्तबाहय देखण्या करत आहेत. ग्रामिण भागासाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. ही दानत फक्त प्राथमिक शिक्षकांमध्ये आहे. शाळांचे अंतर्बाह्य स्वरूप बदलविण्याबरोबरच शिक्षकांनी कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर वाडीवस्तीवर जाऊन मुलांना शिकविले आहे.

जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे म्हणाले, माझे वडील शिक्षक होते . मला शिक्षकांविषयी आदर आहे. विश्वास ठेवला की शिक्षक जोमाने काम करतात याचा मला अनुभव आहे. गुरुकुल समिती गुणवंतांचा नेहमीच सन्मान करते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश आहेर , गोरक्ष हासे , शिवाजी नागरे, ज्ञानेश्वर नागरे,भास्कर मोहिते , श्रीकांत साळवे,  उत्तम गायकवाड ,विठ्ठल कडूस्कर ,गोरक्ष मदने , भास्कर हासे , श्रीकांत बिडवे , सुनील टकले , संजय कानवडे , सचिन अंकाराम , राजाराम कानवडे , विलास वाकचौरे, मीना साबळे , प्रतिभा नागरे, छाया करकंडे , प्रमिला हासे , राम हांडे ,संजय नवले , अमोल जाधव, प्रशांत बैरागी , राजू हासे, किरण कटके, प्रशांत भंडारे , बाबासाहेब गायकवाड यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षय खतोडे यांनी केले तर आभार गोकुळ कहाणे यांनी व्यक्त केले.   

COMMENTS