Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई अग्निशमन दलाच्या भरतीची यादी जाहीर

मुंबई ः मुंबई अग्निशमन दलाच्या भरतीमध्ये मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या 873 उमेदवारांची यादी महापालिकेने जाहीर केली आहे. यादीतील पात्र उमेदवारांची

ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापले
 एम.आय.एम आणि भाजप या दोन्ही पक्षाचं आंदोलन म्हणजे  मिलीभगत – सुरज चव्हाण 
‘जिगोलो’ चे काम देण्याचे आमीष दाखवून 350 तरुणांची फसवणूक

मुंबई ः मुंबई अग्निशमन दलाच्या भरतीमध्ये मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या 873 उमेदवारांची यादी महापालिकेने जाहीर केली आहे. यादीतील पात्र उमेदवारांची पुढील आठवड्यात वैद्यकीय चाचणी होणार आहे. त्यानंतर सहा महिने अग्निशमन दलाचे प्रशिक्षण झाल्यानंतर ही तुकडी सेवेत दाखल होणार आहे. अग्निशामक संवर्गातील 910 पदांसाठी, पुरुष व महिला उमेदवारांची सरळ सेवा पद्धतीने भरती प्रक्रिया दिनांक 13 जानेवारीपासून सुरू झाली होती. दहिसर (पश्‍चिम) मधील गोपीनाथ मुंडे मैदान या ठिकाणी राबवलेल्या या भरती प्रक्रियेसाठी मोठ्या संख्येने आलेल्या उमेदवारांना वेळेअभावी सामावून घेता आले नव्हते. त्यामुळे उमेदवारांना टोकन देण्यात आले होते व नंतर त्यांचीही चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये उमेदवारांना धावणे, जम्पिंग शीट मध्ये उडी मारणे, मानवकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या मार्गाने धावणे, चढणे आणि उतरणे जोर काढणे, अशा मैदानी परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

COMMENTS