Homeताज्या बातम्या

इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत अगस्ती विद्यालयाचे उज्ज्वल यश; बहुसंख्य विद्यार्थी झाले पात्र

अकोले: श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटी संचलित, अगस्ती विद्यालयातील इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अत्यंत नेत्रदीपक लागला आहे. या परीक्षेत

घरफोडी करत सात लाखांचा ऐवज लंपास; नेवासा तालुक्यातील माका येथील आखाडे वस्तीवरील धक्कादायक घटना
लोणी व्यंकनाथ येथे शेततळ्यात पडून दोन चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू; रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याचा आरोप
मुंबईत वाहन स्क्रॅपिंग केंद्र उभारणीसाठी तातडीने कारवाई करा; मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रशासनाला निर्देश
Eligible students to be awarded Rs. 7,500 per year; This year, the name of  the fourth, seventh scholarship exams, primary and secondary scholarship  exams has been changed

अकोले: श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटी संचलित, अगस्ती विद्यालयातील इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अत्यंत नेत्रदीपक लागला आहे. या परीक्षेत विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी पात्र ठरले असून, विद्यालयाने आपली यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत शासनाच्या नवीन धोरणानुसार इयत्ता सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विद्यालयाच्या वतीने जादा तास, वैयक्तिक मार्गदर्शन आणि नियमित सराव यांसारखे उपक्रम राबविण्यात आले. संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी तथा थोर स्वातंत्र्यसेनानी गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी यांच्या प्रेरणेतून विद्यालयाने यशाचा वाढता आलेख कायम ठेवला आहे.

विद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असते. यापूर्वी इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही विद्यालयाने चमकदार कामगिरी केली होती. गुणवत्तापूर्ण शिक्षण हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन संस्थेच्या सर्वच शाळांमध्ये हे उपक्रम राबवले जातात.

पात्र ठरलेले गुणवंत विद्यार्थी:

प्रणिती वाकचौरे, सारंगी हासे, कृष्णा सदगीर, सानिका बांबळे, अभय नवले, श्लोक चासकर, स्वराली बडे, संस्कृती दराडे, निमिश शेळके, लक्ष्मी दातखिळे, वेदिका धुमाळ, रिया मडके, श्रद्धा मंडलिक, आराध्या जोर्वेकर, स्वरांजली वाकचौरे, हर्षदा आंधळे, वेदांत चौधरी, आदित्य शिंदे, श्रेयस आभाळे आणि आयुष यादव हे विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले आहेत.

या यशाबद्दल पात्र विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या सेक्रेटरी शैलजा पोखरकर, कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी, विद्यालयाचे प्राचार्य संजय शिंदे, उपमुख्याध्यापक तात्यासाहेब दौंड, पर्यवेक्षिका नंदा गोपाळे, शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षक-पालक संघ पदाधिकाऱ्यांकडून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS