Homeताज्या बातम्या

मातोश्रीवरील महत्त्वाच्या बैठकीपूर्वी खासदार भाऊसाहेब वाकचौरे ‘नॉट रिचेबल’; ठाकरे गटात खळबळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांची तातडीची बैठक मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी बोलवली

तुकाराम मुंडेंचा धडाका! एफडीएच्या धाडसत्राने नांदेडमधील भेसळखोरांचे धाबे दणाणले; निकृष्ट मालाची गुपचूप विल्हेवाट सुरू
घोडेगावमध्ये संताप; पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर तीन दिवसांपासून मृत बैल तसाच, तीव्र दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
वादळाने नुकसानग्रस्त झालेली वीजयंत्रणा तातडीने दुरुस्त करा; आमदार विवेक कोल्हे यांची महावितरणकडे आग्रही मागणी
भाऊसाहेब वाकचौरे काठावरच? सकाळपासून नॉट रिचेबल, बैठकीला पुन्हा दांडी? ठाकरे  गटात अस्वस्थता

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांची तातडीची बैठक मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलवली आहे. मात्र, या बैठकीपूर्वीच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

पक्षातील सद्यस्थिती आणि संभाव्य राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, बैठकीच्या ऐन आधीच वाकचौरे यांच्याशी संपर्क होत नसल्याने ठाकरे गटातील नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब वाकचौरे हे मागील काही दिवसांपासून कुटुंबासह बाहेरगावी गेले असून, त्यांचा दूरध्वनी (मोबाईल) सकाळपासून बंद लागत आहे. त्यांच्या नेमक्या वास्तव्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही, तसेच त्यांच्या स्वीय सहाय्यकांनाही (PA) त्यांच्या हालचालींबाबत स्पष्ट माहिती नसल्याचे समजते.

अलीकडच्या काळात खासदार वाकचौरे यांनी राज्यातील काही प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या या अनुपस्थितीला आता मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणांबाबत विविध दावे-प्रतिदावे सुरू आहेत. काही खासदार संपर्कात असल्याचा दावा सत्ताधारी गटातील नेत्यांनी केल्यामुळे विरोधी पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी ही बैठक बोलावल्याचे मानले जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

COMMENTS