Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी पोलिसांची कामगिरी;  २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

परराज्यातून गांजाची तस्करी करणारे  जेरबंद पाथर्डी/शेवगाव : पाथर्डी पोलिसांनी सोमवारी (दि.६)  सकाळी कारवाई करत परराज्यातून गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत तब्बल ६० किलो गांजा व बोलेरो पिकअप वाहन असा एकूण २७ लाख ४१ हजार २००  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मध्यप्रदेश राज्यातील दोन आरोपी पांढरी पूल ते पाथर्डी रोडने बोलेरो पिकअपमध्ये गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार आहेत. या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून मीरी शिवारात सापळा रचला. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास संशयित पिकअप अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनातील रिकाम्या कॅरेटखाली सात गोण्यांत भरलेला वीस लाख रुपये किमतीचा ६० किलो गांजा आढळून आला. तसेच ७,००,००० किमतीचे पिकअप वाहन जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे तुलसीदास दर्गादास खरगे (वय २५) व दिनेश सिलदार सोलंकी (वय २४)

गाडी लावण्याच्या वादातून बीड जिल्हा न्यायालयात वकिलावर हल्ला
राहुरीत पतीचा गळा दाबून खून
कंटेनरमधून गोवंश जनावरांची तस्करी

परराज्यातून गांजाची तस्करी करणारे  जेरबंद

पाथर्डी/शेवगाव : पाथर्डी पोलिसांनी सोमवारी (दि.६)  सकाळी कारवाई करत परराज्यातून गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत तब्बल ६० किलो गांजा व बोलेरो पिकअप वाहन असा एकूण २७ लाख ४१ हजार २००  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मध्यप्रदेश राज्यातील दोन आरोपी पांढरी पूल ते पाथर्डी रोडने बोलेरो पिकअपमध्ये गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार आहेत. या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून मीरी शिवारात सापळा रचला. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास संशयित पिकअप अडवून तपासणी केली.

तपासणीदरम्यान वाहनातील रिकाम्या कॅरेटखाली सात गोण्यांत भरलेला वीस लाख रुपये किमतीचा ६० किलो गांजा आढळून आला. तसेच ७,००,००० किमतीचे पिकअप वाहन जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे तुलसीदास दर्गादास खरगे (वय २५) व दिनेश सिलदार सोलंकी (वय २४)

COMMENTS