Homeकृषी

कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची गृहराज्य मंत्र्यांकडून पाहणी

सातारा / प्रतिनिधी : कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची पाहणी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज दसाई यांनी आज केली.या प्रसंगी मुख्य कार्

शेतकऱ्यांनी ड्रॅगन फळाची शेती करावी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत आवाहन
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या तक्रारींबाबत विमा कंपन्यांशी चर्चा करू – कृषीमंत्री दादाजी भुसे
वेताळबाबा स्टेडियमच्या माध्यमातून निघोजकरांना ऊर्जा : कवाद

सातारा / प्रतिनिधी : कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची पाहणी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज दसाई यांनी आज केली.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, प्रांतधिकारी सुनिल गाडे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे उपस्थित होते.
पाहणी प्रसंगी ना. देसाई म्हणाले, कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौकाविहार सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्र्यांच्यासोबत बैठका झाल्या आहेत. कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौका विहार सुरु झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. कोयना जलाशयात नौका विहार सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असून पर्यटक व धरणाची सुरक्षितता पाहुन योग्य तो प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत पाठविण्यात येईल.

COMMENTS