Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निरोगी शरीर राहण्यासाठी जीवनात व्यायामाला मोठे महत्त्व :- डॉ भारती पवार

नाशिक - जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात Fssai द्वारे आयोजित वोकेथॉन चे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आ

माननीय पंतप्रधान मोदींजींच्या नेतृत्वात देश आत्मनिर्भरतेकडे : डॉ भारती पवार
प्राथमिक सुविधांच्या उपलब्धतेवर भर -राज्यमंत्री डॉ भारती पवार 
विकसित भारत संकल्प यात्रा म्हणजे विकासाचा रथ :डॉ भारती पवार 

नाशिक – जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात Fssai द्वारे आयोजित वोकेथॉन चे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला या तीन किलोमीटरच्या वोकेथॉन मध्ये डॉ भारती पवार यांच्यासह भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्थेचे सरचिटणीस एडवोकेट नितीन ठाकरे महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानोबा ढगे तसेच हजारो संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ भारती पवार म्हणाल्या की विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या उत्साहाला योग्य दिशा देण्यासाठी वोकेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे फिट इंडिया संकल्पनेमध्ये व्यायामाचे योगाचे मोठे महत्त्व आहे योग ही भारताची प्राचीन संस्कृती आज जगभरातील 150 देशांनी स्वीकारली आहे आपल्या करिअरमध्ये आरोग्याला महत्त्व देणे गरजेचे आहे कारण आरोग्यमय भारत या संकल्पनेतूनच देशाची प्रगती होईल असेही डॉ.भारती पवार म्हणाल्या.

यावेळी ज़िल्हा अध्यक्ष शंकाराव वाघ, भागवत बाबा बोरस्ते, सतीश मोरे, बापू पाटील, सुनिल पवार ,योगेश चौधरी, नितीन जाधव, योगेश तिडके,अल्पेश पारख, प्रशांत घोडके, परेश शहा, आदेश सानप,डॉ गचाले,प्रशांत गोसावी, राजेंद्र सोनवणे, नितीन काळे,दत्तात्रय काळे, संदिप झुटे, राहुल विधाते, लक्ष्मण निकम, तुषार वाघमारें,आशिष विधाते, अलका लबडे, रत्ना मोरे, प्रतिमा मोरे, अंजु चव्हाण, रोहित कापुरे, जितू काळे तसेच FSSAI कार्यकारी संचालक इनोशी शर्मा , प्रिती चौधरी,शरद राव,जीथा के,डॉ के यू मेठेकर,सुकांत चौधरी, ज्योती हरणे,अमोल जगताप,चेतना भिसले,अजय खिरनार,निलेश दुंधळे सह FSSAI चे अधिकारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS