Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पूरग्रस्तांना मदत करताना हृदविकाराचा झटका

उरणच्या पोलीस अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

मुंबई: गेल्या तीन दिवसांत महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेकांचे जीव गेले. त्यापैकीच एक म्हणजे उरण पोलीस ठाण्य

प्रचारासाठी लागणार्‍या परवानग्या व कागदपत्राची यादी जाहीर
येलूर ग्रामपंचायत बिनविरोध : महाडीक गटाला सरपंच पद
शिवसेना जिल्हाप्रमुखाला मारहाण करणं पडलं महागात l LOKNews24

मुंबई: गेल्या तीन दिवसांत महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेकांचे जीव गेले. त्यापैकीच एक म्हणजे उरण पोलीस ठाण्यात ड्युटीवर असणारे पोलीस उपनिरीक्षक विशाल राजवाडे. एपीआय विशाल राजवाडे हे आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. विशाल राजवाडे हे रात्रभर उरण भागातील चिरनेर भागात पुरग्रस्तांना मदत करत होते. मंगळवारी चिरनेर भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. स्वतः फिल्डवर उतरून विशाल राजवाडे हे पूरग्रस्तांना मदतीचा हात देत होते. त्याचवेळी त्यांना हदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. विशाल राजवाडे यांच्या दुर्दैवी मृत्यूने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. मदतकार्य सुरु असताना विशाल राजवाडे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना डॉक्टरांकडे नेले त्यानंतर पोलिसांनी विशाल राजवाडे यांना मुंबई येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. कर्तव्य बजावत असताना उप पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने उरण पोलीस यंत्रणेने व चिरनेर गावातील रहिवाशांनी हळहळ व्यक्त करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. पोलीस परिवार या संस्थेनं हा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नेला व तातडीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांना फोन केला. विशाल राजवाडे यांचा कर्तव्यांवार असताना मृत्यू झाला आहे जेवढी शक्य असेल तेवढी मदत या कुटुंबियांना करा, तसेच अनुकंपतत्वावर कुटुंबियांतील व्यक्तीला घेण्यात येऊ शकतं का? यासाठी तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे. झालेली घटना हि वेदनादायी असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली.

COMMENTS