Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मान्सून लवकरच धडकणार

11 जूनपर्यंत राज्यात होणार सक्रिय

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात लवकरच मॉन्सून सक्रिय होणार आहे. यामुळे मुंबई आणि पुणेकरांसह राज्यातील नागरिकांना उष्मा आणि आर्द्रतेपासून दिलासा मिळू शक

यात्रेनिमित्त जोतिबा डोंगर गुलालाने न्हाऊन निघाला
मुंबईच्या रस्त्यांवर थुंकणे पडणार महागात
नगर शहरात मुसळधार पावसाची हजेरी… गाड्या गेल्या पाण्याखाली… रस्त्याला नदीचे स्वरूप (Video)

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात लवकरच मॉन्सून सक्रिय होणार आहे. यामुळे मुंबई आणि पुणेकरांसह राज्यातील नागरिकांना उष्मा आणि आर्द्रतेपासून दिलासा मिळू शकतो. नैऋत्य मॉन्सूनची लवकरच सक्रिय होणार असल्याने राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने या वर्षीच्या मान्सूनच्या आगमनाच्या तारखेबद्दल अद्याप अधिकृत जाहीर केले नाही. मॉन्सूनसध्या केरळमध्ये दाखल होणाच्या तयारीत आहे. दक्षिण-पश्‍चिम मॉन्सून साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो. या वर्षी, खचऊ ने म्हटले आहे की, मॉन्सून 4 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. 5. ते 6 जूनच्या सुमारास अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे या ठिकाणी चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊ शकते. असे झाल्यास, यामुळे पाऊस लांबू शकतो. जून 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन 15 जूनपर्यंत चार दिवसांनी लांबले होते. वॅगरीज ऑफ वेदर या खाजगी हवामानाचा अंदाज देणारा ब्लॉग चालवणारे राजेश कपाडिया म्हणाले, मुंबईत 7 ते 8 जूनपर्यंत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. तथापि, योग्य मान्सूनचा हंगाम 14 ते 15 जूनच्या आसपास तयार होऊ शकतो. 3 जूनच्या आसपास मान्सूनचा नवा भोवरा तयार होणे अपेक्षित आहे. एकदा तो तयार झाल्यानंतर मॉन्सून बळकट होईल. कपाडिया म्हणाले की जून आणि जुलै महिन्यात सामान्य पाऊस पडण्याची अपेक्षा आहे, तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पर्जन्यमानाची कमतरता दिसून येईल. अरबी समुद्रात 5-6 जूनच्या सुमारास कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. स्कायमेट वेदरचे हवामानशास्त्र आणि हवामान बदलाचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात मान्सूनपूर्व सरी अपेक्षित आहेत. मुंबईत मॉन्सूनची सुरुवात समाधानकारक असू शकते. तथापि, मराठवाडा आणि विदर्भासारख्या राज्याच्या अंतर्गत भागात पुरेसा पाऊस पडणार नाही, अशी शक्यता आहे.

COMMENTS