Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्गावर धारधार शस्त्रासह एकास अटक

पेठ / वार्ताहर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वडगाव पोलीस ठाणे हद्दीत वाठार (ता. हातकणंगले) येथे कर्नाटकातील रोहीफसिंग बाबनसिंग टिक (वय 20,

परदेशातून सातारा जिल्ह्यात आलेले 33 जण बेपत्ता; प्रशासन चिंतेत
जिल्हा परिषदेच्या पेट्री शाळेत इंग्रजीचे धडे
त्रिपुराच्या नावावर महाराष्ट्रातील घटना लाजिरवाणी : त्रिपुराचे उपमुख्यमंत्री

पेठ / वार्ताहर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वडगाव पोलीस ठाणे हद्दीत वाठार (ता. हातकणंगले) येथे कर्नाटकातील रोहीफसिंग बाबनसिंग टिक (वय 20, रा. चिकुर्डी, जि. बेळगाव) या युवकास धारधार शस्त्रे विक्रीसाठी घेवून जात असताना वडगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून नऊ तलवारी व पाच चाकू व दुचाकी असा एक लाखाचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पेठ वडगाव पोलिसांना कर्नाटक राज्यातून दुचाकीवरून एक युवक धारदार शस्त्रे विक्रीसाठी घेवून किणी टोल नाक्याच्या दिशेने निघाला असल्याची गोपनीय माहिती वडगाव पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार वडगाव पोलिसांनी महामार्गावर सापळा रचून दुचाकीवरून आलेल्या रोहीफसिंग बाबनसिंग टिक याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून नऊ धारदार तलवारी, पाच चाकू, मोटारसायकल जप्त करण्यात आली. याप्रकरणी त्याच्याविरोधात घातक शस्त्रे जवळ बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केलेला रोहीफसिंग हा शस्त्रे विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर येत आहे. विना नंबर प्लेट दुचाकी घेवून हा युवक कर्नाटकातून महाराष्ट्र राज्यात आला आहे. ही शस्त्रे कोणाला विक्रीसाठी घेवून जाणार होता. तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे याचा तपास वडगाव पोलीस करत आहेत. कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी रामेश्‍वर वैंजने, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बी. बी. पाटील, स्वाती सूर्यवंशी, पीएसआय अर्चना पाटील, सहाय्यक फौजदार दिपक पोळ, पोहेकॉ रवींद्र गायकवाड, पो. ना. रामराव पाटील, दादा माने, योगेश राक्षे, संदीप गायकवाड, प्रमोद चव्हाण, विकी भंडारे, सतिश सुतार, विकास घस्ते, रणवीर जाधव, विशाल हुबाले यांनी केली.

COMMENTS